नाशिक – नाशिकच्या दोन पोलीस निरीक्षकांसह १६ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे पदक जाहीर झाले. यामध्ये नाशिक मधील पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, डॉ.अंचल मुदगल, श्रीकांत निंबाळकर, सहाय्यक उपनिरीक्षक सतीश जाधव, विलास वाघ हवालदार रवींद्रकुमार पानसरे, बाळू लभडे, नितीन संधान, सुनील कुलकर्णी, पोलीस नाईक राहुल जगताप, यतीनकुमार पवार, ईमोद्दीन मुल्ला, दशरथ पागी, अनिल गोरे, अश्विनी देवरे, एकनाथ बाविस्कर, भालचंद्र खैरनार, प्रवीण वाघमारे, प्रकाश महाजन यांच्या नावाचा समावेश आहे. नाशिकबरोबरच महाराष्ट्रातील ८०० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे पुरस्कार मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी परिपत्रक जारी केले असून त्यात पोलीस विभागातील विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उल्लेखनीय व प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक, पोलीस पदक व पोलीस शौर्यपदक प्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांना बोधचिन्ह व सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.