नाशिक – नाशिक पोलिस आयुक्तालयात विशेष शाखेत कार्यरत असलेले विलास सुरेश सोनार यांचा मृतदेह आसाराम बापू पूलजवळ बागड इस्टेट येथील काकड मळा विहिरीत आढळून आला. दहा बारा दिवसांपासून ते कामावर हजर नव्हते. दुपारी २.३० चे सुमारास विहिरीत बॉडी सापडली अशी माहिती पोलिसांनी दिली. सोनार हे अशोक स्तंभ ढोल्या गणपतीचे मागे राहत होते. सरकारवाडा पोलिस ठाण्याचे हद्दीत त्यांची ड्युटी होती. म्हसरूळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. दरम्यान या घटनेबद्दल पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी दु:ख व्यक्त केले.