इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्यातील १४ पोलीस अधीक्षकांना बदलीपर बढती देण्यात आली असून उप महानिरीक्षक पदावर त्यांची पदोन्नती करण्यात आली आहे. त्यानुसार, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांना अपर पोलीस आयुक्त मध्य प्रादेशिक विभाग मुंबई या ठिकाणी झाली नियुक्ती देण्यात आली आहे. तर, पुणे ग्रामीणच्या पंकज देशमुख यांना पुणे शहर अपल पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे. आयपीएस मोक्षदा पाटील (IPS) यांना राज्य राखीव पोलीस बल गटाच्या समादेशक पदावरुन पोलीस उपमहानिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना मुंबईच्या अपर पोलीस (Police) आयुक्त विशेष शाखा पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

