शुक्रवार, ऑक्टोबर 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पोकोने एक्‍स७ सिरीजमध्ये पोको एक्‍स७ ५जी आणि पोको एक्‍स७ प्रो ५जी लाँच केले

जानेवारी 13, 2025 | 2:01 pm
in संमिश्र वार्ता
0
Himanshu Tandon Country Head POCO with their newly announced brand ambassador Akshay Kumar

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा): नाविन्‍यतेचा आपला वारसा कायम राखत पोको या भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्‍या ग्राहक टेक ब्रँडने जयपूरमध्‍ये उत्‍साहवर्धक इव्‍हेण्‍टदरम्‍यान आपली फ्लॅगशिप एक्‍स७ सिरीज – पोको एक्‍स७ ५जी आणि पोको एक्‍स७ प्रो ५जी लाँच केले. सर्वोत्तम डिस्‍प्‍लेमधील अत्‍याधुनिक सुधारणा, उच्‍च कार्यक्षमता व अद्वितीय टिकाऊपणा असलेली एक्‍स७ सिरीज स्‍मार्टफोन सर्वोत्तमतेला नव्‍या उंचीवर घेऊन जाते आणि प्रीमियम विभागामधील पोकोचे नेतृत्‍व अधिक दृढ करते. पोको इंडियाचा चेहरा म्‍हणून निवड करण्‍यात आलेले बॉलिवुड अभिनेते अक्षय कुमार यांनी उपस्थिती दाखवून या लाँच कार्यक्रमाची शोभा वाढवली, ज्‍यामधून ब्रँडचे साहसी व नीडर तत्त्व दिसून येते, जे ब्रँडचे तत्त्व ‘एक्‍सीड युअर लिमिट्स’शी परिपूर्णपणे संलग्‍न आहे.

पोको इंडियाचे कंट्री हेड हिमांशू टंडन म्‍हणाले, ”पोकोमध्‍ये, आम्‍ही प्रत्‍येक निर्णयामध्‍ये नाविन्‍यतेला प्राधान्‍य देतो. एक्‍स७ सिरीजसह आम्‍ही प्रीमियम स्‍मार्टफोन श्रेणीमध्‍ये नवीन मापदंड स्‍थापित करत आहोत. आम्‍हाला पोको इंडियाचा चेहरा म्‍हणून अक्षय कुमार यांचा सहयोग असण्‍याचा आनंद होत आहे, त्‍यांचे उत्‍साही व्‍यक्तिमत्त्व आमच्‍या सर्वोत्तमतेप्रती कटिबद्धतेशी संलग्‍न आहे. एक्‍स७ सिरीजसह आम्‍हाला जागतिक स्‍तरावर मीडियाटेक डायमेन्सिटी ८४०० अल्‍ट्रा आणि शाओमी हायपरओएस २.० पदार्पण करण्‍याचा, तसेच फ्लॅगशिप-ग्रेड कॉ‍र्नरिंग गोरिला ग्‍लास संरक्षणासोबत आयपी६६+ व आयपी६८ रेटिंग्‍जसह नवीन टिकाऊपणा मापदंड स्‍थापित करण्‍याचा अभिमान वाटत आहे. एक्‍स७ ५जी च्‍या सेगमेंट-फर्स्‍ट १.५के एएमओएलईडी ३डी कर्व्‍ह डिस्‍प्‍ले ते एक्‍स७ प्रो ५जीच्‍या अद्वितीय कार्यक्षमतेपर्यंत ही सिरीज अविश्‍वसनीय मूल्‍यामध्‍ये प्रमुख नाविन्‍यतेला सादर करत आमच्‍या मागील पिढीमध्‍ये मोठ्या झेपला सादर करते.”

पोको एक्‍स७ ५जीची वैशिष्ट्ये:
पोको एक्‍स७ ५जी सेगमेंटच्‍या सर्वात टिकाऊ १.५के एएमओएलईडी ३डी कर्व्‍ह डिस्‍प्‍लेसह अग्रस्‍थानी आहे, जे ३००० नीट्स सर्वोच्‍च ब्राइटनेस आणि अद्वितीय मजबूतीसाठी कॉर्निंग® गोरिला® ग्‍लास व्हिक्‍टस २ सह सुसज्‍ज आहे. आयपी६६, आयपी६८ आणि आयपी६९* (*सहाय्यक) रेटिंग्‍जसह एक्‍स७ ५जी पाणी, धूळ व रोजच्‍या आव्‍हानांमध्‍ये टिकून राहण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे, ज्‍यामधून स्‍मार्टफोन आकर्षक व प्रबळ राहण्‍याची खात्री मिळते.

कार्यक्षम, विना-व्‍यत्‍यय कार्यक्षमता: मीडियाटेक डायमेन्सिटी ७३०० अल्‍ट्रा चिपसेटची शक्‍ती असलेला एक्‍स७ ५जी सुलभ, विना-व्‍यत्‍यय कार्यक्षमता देतो. या स्‍मार्टफोनमधील ५५०० एएमएच बॅटरी दिवसभर पॉवरची खात्री देते, तर ४५ वॅट हायपरचार्ज डाऊनटाइम कमी करते, ज्‍यामुळे डिवाईस कमी वेळेत चार्ज होतो.

प्रगत कॅमेरा क्षमता: ५० मेगापिक्‍सल सोनी एलवायटी-६०० प्रायमरी कॅमेरासह आकर्षकरित्‍या फोटो कॅप्‍चर करा. यामध्‍ये मोठे एफ/१.५ अर्पेचर व एआय-संचालित वैशिष्‍ट्ये आहेत, जसे अंधुक प्रकाशात आकर्षक फोटोग्राफीसाठी एआय नाइट मोड आणि प्रभावी फोटो एडिटिंगसाठी एआय एरेज प्रो. एक्‍स७ ५जी दिवस असो वा रात्र, प्रत्‍येक फोटोला मास्‍टरपीसमध्‍ये बदलतो.

स्‍टायलिश, नवीन व सर्वोत्तम डिझाइन: पोको यलो, कॉस्मिक सिल्‍व्‍हर आणि ग्‍लेशियर ग्रीन फिनिशेसमध्‍ये आकर्षकता व टिकाऊपणाचे, तसेच प्रबळ रचना दर्जासह प्रीमियम आकर्षकतेचे उत्तम संयोजन आहे. एक्‍स७ ५जी दैनंदिन टास्‍क्‍सची पूर्तता करण्‍यासह तुमच्‍या जीवनशैलीशी जुळून जाण्‍याकरिता डिझाइन करण्‍यात आला आहे.

पोको एक्‍स७ प्रो ५जीची वैशिष्ट्ये:
भारतातील सर्वात मोठ्या बॅटरीसह अद्वितीय नाविन्‍यता: पोको एक्‍स७ प्रो मध्‍ये भारतातील सर्वात मोठी ६५५० एमएएच बॅटरी आहे, जी उत्तम कार्यक्षमता, टिकाऊपणा व सुरक्षिततेसाठी सिलिकॉन कार्बन टेक्‍नॉलॉजी आणि प्रबळ इलेक्‍ट्रोलाइटने सुधारण्‍यात आली आहे. ९० वॅट हायपरचार्ज तंत्रज्ञान असलेली ही बॅटरी दिवसभर कार्यरत राहते आणि फक्‍त १९ मिनिटांमध्‍ये ० टक्‍के ते ५० टक्‍क्‍यांपर्यंत चार्ज होते, ज्‍यामुळे तिच्‍या सेगमेंटमध्‍ये टिकाऊपणा नव्‍या उंचीवर पोहोचला आहे.

३०के सेगमेंटमधील सर्वात शक्तिशाली फोन: एक्‍स७ प्रो मीडियाटेक डिमेन्सिटी ८४०० अल्‍ट्रा प्रोसेसरवर कार्यरत आहे, जे जागतिक पदार्पण करत आहे. प्रखर गेमिंगसाठी डिझाइन करण्‍यात आलेले हे प्रोसेसर २० टक्‍के जलद कार्यक्षमता, शाश्‍वत उच्‍च फ्रेम रेट्स आणि अपवादात्‍मक ब्राइटनेस लेव्‍हल्‍स देते, ज्‍यामधून गेमर्स व पॉवर युजर्सना विनासायास अनुभव मिळतो.

अद्वितीय सुस्‍पष्‍टतेसाठी सर्वोत्तम डिस्‍प्‍ले: १.५के रिझॉल्‍यूशन व ३२०० नीट्स सर्वोच्‍च ब्राइटनेस असलेल्‍या ६.६७-इंच एएमओएलईडी फ्लॅट डिस्‍प्‍लेचा आनंद घ्‍या, ज्‍यामध्‍ये मागील डिवाईसच्‍या तुलनेत ७० टक्‍के सुधारणा करण्‍यात आली आहे. कॉर्नरिंग® गोरिला® ग्‍लास ७आय, २४० हर्ट्झ टच सॅम्प्लिंग रेट आणि २५६० हर्टझ त्‍वरित गेमिंग प्रतिसादासह एक्‍स७ प्रो स्‍ट्रीमिंग किंवा गेमिंग असो प्रत्‍येक टास्‍कसाठी आकर्षक व्हिज्‍युअल्‍स व अद्वितीय टच अचूकता देतो.

क्रांतिकारी एआय-पॉवर्ड कॅमेरा: ऑप्टिकल इमेज स्‍टेबिलायझेशन (ओआयएस) असलेल्‍या ५० मेगापिक्‍सल सोनी एलवायटी-६०० कॅमेरासह अद्वितीयरित्‍या फोटोज कॅप्‍चर करा. एआय स्‍मार्ट-क्लिप, एआय नाइट मोड आणि एआय स्‍काय असलेला हा कॅमेरा प्रत्‍येक क्षणंना सिनेमॅटिक मास्‍टरपीसेसमध्‍ये बदलतो. निऑन-प्रकाशित रस्‍त्‍यांपासून फास्‍ट-अॅक्‍शन शॉट्सपर्यंत एक्‍स७ प्रो अद्वितीय फोटोग्राफीची खात्री देतो.

विनासायास सॉफ्टवेअर अनुभव: एक्‍स७ प्रो अँड्रॉइड १५ वर आधारित शाओमी हायपरओएस २.० असलेला पहिला डिवाईस आहे. या नेक्‍स्‍ट-जनरेशन ओएसमध्‍ये २९ भाषांचे एआय भाषांतर, एआय सबटायटल्‍स, एआय नोट्स आणि डायनॅमिक विजेट्स आहेत, ज्‍यामधून उत्‍पादकता व वैयक्तिकरणाची खात्री मिळते. ३ वर्ष अँड्रॉईड अपडेअ्स आणि ४ वर्ष सिक्‍युरिटी पॅचेससह हा स्‍मार्टफोन तुमचा डेटा सुरक्षित ठेवतो, तसेच फोन फ्यूचर-रेडी असण्‍याची खात्री मिळते.

टिकाऊ, स्‍टायलिश डिझाइन: दृढतेसाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या एक्‍स७ प्रोमध्‍ये आयपी६६+ आयपी६८ व आयपी६९ (सहाय्यक) आणि आकर्षक, टिकाऊ डिझाइन आहे. पोको यलो, ऑब्सिडीयन ब्‍लॅक आणि नेबुला ग्रीनमध्‍ये उपलब्‍ध या डिवाईसमध्‍ये स्‍टाइल व क्षमतेचे मिश्रण आहे.

लाँच ऑफर्स आणि उपलब्‍धता:
पोको एक्‍स७ प्रो २४,९९९* रूपयांच्‍या आकर्षक सुरूवातीच्‍या किमतीमध्‍ये लाँच होण्‍यास सज्‍ज आहे, ज्‍यामध्‍ये फक्‍त पहिल्‍या दिवसासाठी १००० रूपयांच्‍या स्‍पेशल कूपन सूटसह आयसीआयसीआय/एसबीआय/एचडीएफसी बँक कार्डस् किंवा उत्‍पादन एक्‍स्‍चेंजच्‍या माध्‍यमातून २००० रूपयांच्‍या सूटचा समावेश आहे. पोको एक्‍स७ ५जी १९,९९९* रूपयांच्‍या सुरूवातीच्‍या किमतीत उपलब्‍ध असेल, ज्‍यामध्‍ये आयसीआयसीआय/एसबीआय/एचडीएफसी बँक कार्डस् किंवा उत्‍पादन एक्‍स्‍चेंजच्‍या माध्‍यमातून २००० रूपयांच्‍या सूटचा समावेश आहे.

तसेच, पोको एक्‍स७ प्रो १२ महिन्‍यांच्‍या नो-कॉस्‍ट ईएमआय पर्यायासह येतो, तर पोको एक्‍स७ ९ महिन्‍यांच्‍या नो-कॉस्‍ट ईएमआय पर्यायासह येतो. ही आतापर्यंतची सर्वोत्तम डिल आहे.

फक्‍त पहिल्‍या दिवशी वरील विशेष किमतींचा आनंद घ्‍या, जेथे पोको एक्‍स७ प्रोची विक्री १४ जानेवारी दुपारी १२ वाजल्‍यापासून सुरू होत आहे आणि पोको एक्‍स७ ची विक्री १७ जानेवारी दुपारी १२ वाजल्‍यापासून सुरू होत आहे. हे दोन्‍ही डिवाईसेस फक्‍त फ्लिपकार्टवर उपलब्‍ध आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

टाटा मोटर्सने नवीन तंत्रज्ञान, डिझाइन आणि रंगांसह टियागो, टियागो, ईव्ही आणि टिगोर या तीन कार लाँच केल्या…..

Next Post

रिलायन्स महाकुंभमध्ये उभारणार ‘कॅम्पा-आश्रम’; यात्रेकरूंना मिळणार आरामाची सुविधा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

Home Flat e1681892298444
मुख्य बातमी

घरकुल बांधणीत या जिल्ह्याने रचला नवा विक्रम! ५० हजारांहून अधिक घरकुलांची पूर्ती…

ऑक्टोबर 22, 2025
PIC1OG8A
महत्त्वाच्या बातम्या

स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला लष्कराचा मिळाला हा बहुमान… गोल्डन बॉय आता या पदवीने ओळखला जाणार… 

ऑक्टोबर 22, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा भाऊबीजेचा दिवस… जाणून घ्या, गुरुवार, २३ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 22, 2025
IMG 20210302 WA0026
संमिश्र वार्ता

दिवाळीनंतर फिरायला जायचंय? या बीचवर नक्की जा… येथील अभूतपूर्व नजारा पाहून खुशच व्हाल…

ऑक्टोबर 22, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय… काढला हा शासनादेश… अशी मिळणार मदत…

ऑक्टोबर 21, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा दिवाळी पाडव्याचा दिवस… जाणून घ्या, बुधवार, २२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 21, 2025
diwali padva balipratipada
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा- असे आहे महत्त्व

ऑक्टोबर 21, 2025
Untitled 42
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीत या ११ गोष्टी लक्षात ठेवा… ज्योतिष शास्त्री प्रशांत चौधरी यांनी दिल्या या टीप्स…

ऑक्टोबर 21, 2025
Next Post
IMG 20250113 WA0479 1

रिलायन्स महाकुंभमध्ये उभारणार ‘कॅम्पा-आश्रम’; यात्रेकरूंना मिळणार आरामाची सुविधा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011