मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पोको इंडियाने आपला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून बॉलिवुड अभिनेता अक्षय कुमार यांची निवड केली आहे. या धाडसी पुढाकारामधून भारतातील तरूणांसाठी तंत्रज्ञानाला नव्या उंचीवर घेऊन जाण्याप्रती ब्रँडची कटिबद्धता दिसून येते. बहुप्रतिक्षित पोको एक्स७ सिरीजच्या लाँचच्या अगोदर ही उत्साहवर्धक घोषणा करण्यात आली आहे.
नीडर उत्साह व चाहत्यांमध्ये लोकप्रियतेसाठी ओळखले जाणारे अक्षय कुमार पोकोच्या ‘मेड ऑफ मॅड’ तत्त्वाचे परिपूर्ण प्रतीक आहेत. त्यांच्यासोबतचा सहयोग एक्स७ सिरीज कॅम्पेन ‘एक्सीड युअर लिमिट्स’शी विनासायासपणे संलग्न होतो, जी वापरकर्त्यांना आव्हानांना दूर करण्यास आणि असाधारणपर्यंत पोहोचण्यास प्रेरित करते.
पोको एक्स७ सिरीजमध्ये प्रीमियम किफायतशीर विभागामधील उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत. पोको एक्स७ मध्ये त्याच्या दर्जामधील सर्वात टिकाऊ १.५के एएमओएलईडी ३डी कर्व्ह डिस्प्ले आहे, तर एक्स७ प्रो सेगमेंटमधील सर्वात मोठी ६५५० एमएएच बॅटरीसह नवीन मापदंड स्थापित करतो, ज्यामध्ये प्रगत सिलिकॉन कार्बन टेक्नॉलॉजी व प्रबळ इलेक्ट्रोलाइट आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये अत्याधुनिक शाओमी हायपरओएस २.० ची शक्ती आहे, ज्यामधून सुधारित युजर अनुभवासाठी नेक्स्ट-जनरेशन एआय क्षमता मिळतात. टिकाऊपणा, कार्यक्षमता व सर्वोत्तम कामगिरीसाठी डिझाइन करण्यात आलेले पोको एक्स७ ५जी आणि एक्स७ प्रो ५जी किफायतशीर दरांमध्ये फ्लॅगशिप-लेव्हल इनोव्हेशन देतात, जे स्मार्टफोन बाजारपेठेत मूल्याला परिभाषित करतात.
या घोषणेबाबत मत व्यक्त करत पोको इंडियाचे कंट्री हेड हिमांशू टंडन म्हणाले, ”पोकोमध्ये आम्ही नेहमी धाडसी पर्यायांचा अवलंब केला आहे, ज्यामधून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वितरित करण्याचा आणि भावी पिढीला सक्षम करण्याचा आमचा दृष्टिकोन दिसून येतो. अक्षय कुमार यांचे नीडर व्यक्तिमत्त्व आणि चाहत्यांमधील लोकप्रियता त्यांना ब्रँडसाठी परिपूर्ण बनवतात, जेथे ब्रँड मर्यादांना दूर करत मूल्य परिभाषित करण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्यासोबतचा सहयोग, तसेच एक्स७ सिरीजचे लाँच यामधून नव्या उंचीवर पोहोचण्यावरील आणि परिवर्तनात्मक अनुभव वितरित करण्यावरील आमचा धोरणात्मक फोकस दिसून येतो, जेथे आम्ही उत्साहवर्धक २०२५ साठी सज्ज आहोत.”
बॉलिवुड अभिनेते अक्षय कुमार म्हणाले, ”पोकोसोबतचा सहयोग माझ्यासाठी उत्साहवर्धक नवीन अध्याय आहे. मी वेगळे असण्याचे धाडस दाखवणाऱ्या ब्रँड्सचे नेहमी कौतुक केले आहे आणि पोकोचा नाविन्यतेप्रती नीडर दृष्टीकोन व त्यांचे ‘मेड ऑफ मॅड’ तत्त्व माझ्या व्यक्तिमत्त्वाशी संलग्न आहे. एक्स७ सिरीज कॅम्पेन ‘एक्सीड युअर लिमिट्स’मधून माझा विश्वास असलेली ऊर्जा व निर्धार दिसून येतो, ते म्हणजे मर्यादांना दूर करणे आणि सर्वोत्तमतेसाठी प्रयत्न करणे. मला या प्रवासाचा भाग होण्याचा आनंद होत आहे. पोको ब्रँड भारतातील तरूणांना धाडसी पर्यायांचा अवलंब करण्यास आणि तंत्रज्ञानामधील शक्यतांना नव्या उंचीवर घेऊन जाण्यास प्रेरित करतो.”