बारामती (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पावसाळ्यात बिळामध्ये पाणी गेल्यानंतर सरपटणारे प्राणी बाहेर येतात. विशेषतः साप आणि विषारी जातीचे नाग या काळात जमिनीत असलेल्या बिळांमधून बाहेर येऊन घर, बागा किंवा अडगळीच्या जागी लपून बसतात. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी जाताना सावधगिरी बाळगावी लागते. तसेच साप निघाल्यास सर्पमित्राला बोलवण्यात येते. सर्पमित्र कुशलतेने साप किंवा नागासारखे प्राणी पकडून जंगलात सोडून देतात. परंतु काही वेळा या सर्पमित्रांच्या जीवावरही बेतू शकते. असाच प्रकार बारामती तालुक्यात घडला असून एका सर्पमित्राला विषारी नाग चावल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सत्र हळूहळू व्यक्त होत आहे.
विषारी नागाचा दंश
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सुपा गावानजीक असलेल्या खराडवाडी येथे एका शेताजवळील गोठ्याच्या घरात मोठा सर्प निघाला. हा साप विषारी नाग असल्याने सर्वांची धांदल उडाली, त्यामुळे तात्काळ लोणी (भापकर) येथील सर्पमित्र विजय छबुराव यादव यांना सर्प पकडण्यासाठी बोलावण्यात आले. हा सर्प पकडण्याच्या यादव यांना विषारी नागाने चावा घेतला होता. गोठा व घरात साप हा जनावरांसाठी बनवलेल्या मुरघास ठेवण्याच्या खड्ड्यात नाग पकडण्यासाठी गेले असताना त्यांना हा विषारी नागाने दंश केला. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
३० वर्षांचा अनुभव
खरे म्हणजे त्यांना साप चावला तरी त्याकडे थोडे दुर्लक्ष केले आणि ते त्या सापाला दूर जंगलात घेऊन गेले. वास्तविक पाहता त्यांनी तात्काळ उपचारार्थ दवाखाण्यात जायला हवे होते.जखमी अवस्थेतही त्यांनी विषारी नागास मोकाळ्या रानांत सोडून दिले होते. १६ ऑगस्ट रोजी त्याची प्रकृती धोक्यातून बाहेर आली होती. मात्र आज अखेर मृत्यूशी झुंज देत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या ३० पेक्षा अधिक वर्षापासून ते सर्पमित्र म्हणून शेतकरी व गावोगावी साप पकडण्यासाठी जात होते. शेतकरी अथवा इतरत्र कोणाकडूनही पैसे न घेता सापास जीवदान देण्याचे काम त्यांनी अखेरपर्यंत केले. त्यांच्या मृत्यूमुळे शेतकरी वर्गाकडून हळहळ व्यक्त होत आहे. हजारो सर्पांना जीवदान देणाऱ्या सर्पमित्राचा मृत्यू नाग चावल्याने झाला असल्याने परिसरातून दुःख व्यक्त होत आहे.
Poisonous Cobra Sneck Bite Sneck Friend Death
Pune Baramati