पिंपळगाव बसवंत (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पिंपळगाव बसवंत येथील ज्येष्ठ साहित्यिक व सेवानिवृत्त प्राचार्य लक्ष्मण महाडिक यांचा महाराष्ट्र राज्य शासनाच्या उत्कृष्ठ साहित्य निर्मितीचा बहिणाबाई चौधरी व अनेक राज्य पुरस्काराने सन्मानित झालेला ‘कुणब्याची कविता’ हा काव्यसंग्रह अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने एम. ए मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात दुसऱ्यांदा समावेश केला आहे.
कविवर्य प्रा. लक्ष्मण महाडिक यांच्या ‘कुणब्याची कविता’ हा काव्यसंग्रह अनेक विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमात समावेश केलेला आहे. विशेष गौरवची बाब म्हणजे हा काव्यसंग्रह या विद्यापीठाने यापूर्वीही एम ए मराठी विषयासाठी अभ्यासक्रमांमध्ये समावेश केला होता पुन्हा दुसऱ्यांना या काव्यसंग्रहाची दखल घेत एम. ए च्या अभ्यासक्रमात मराठी विषयासाठी समावेश केला होता. प्रा.लक्ष्मण महाडिकांच्या ‘कुणब्याची कविता’ हा काव्यसंग्रह अनेक समीक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अनेक समीक्षकांनी या काव्यसंग्रहावर आपली परीक्षणे नोंदविली आहेत.मराठी ग्रामीण साहित्यातील दोनहजार सालानंतरच्या ग्रामीण कवितेच्या संदर्भातील लक्षणीय कलाकृती म्हणून ‘कुणब्याची कविता’ या काव्यसंग्रहाकडे पाहिलं जातं.
या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र शासनाच्या राज्य पुरस्कारांसोबतच महाराष्ट्रातील अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. हा काव्यसंग्रह म्हणजे शेतकरी वर्गाच्या आयुष्याची व्यथा आणि वेदना यांची संवेदना घेऊन आला आहे. त्यांच्या काव्यसंग्रहाच्या निवडीबद्दल वैदर्भीय कवी विठ्ठल वाघ प्रा. जयराम खेडेकर, प्रा. रंगनाथ पठारे, डॉ. एकनाथ पगार, डॉ.दिलीप धोंडगे, कवी प्रकाश होळकर, ऐश्वर्या पाटेकर, प्राचार्य ज्ञानोबा ढगे, डॉ. भास्कर ढोके, डॉ. शंकर बोराडे, कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे, माजी आम.उत्तमबाबा भालेराव, निफाडचे आम. दिलीपराव बनकर,माजी आम. अनिल कदम, सरपंच भास्करराव बनकर, तानाजीराव बनकर, मविप्रचे उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, सभापती दिलीपराव मोरे,सुरेश दादा खोडे, संजय उफाडे, माजी आ. नानासाहेब बोरस्ते, शिवाजीराव निरगुडे, रवींद्र मोरे, प्राचार्य अण्णासाहेब शिंदे, डॉ.दिलीप पवार, प्रा.कैलास सलादे, कवी राजू देसले, प्रा. अरुण ठोके, कवी विष्णू थोरे, प्रा.संदीप जगताप, बापूसाहेब पाटील.सतीश मोरे,सुहास मोरे,प्रा.प्रकाश मोरे,चंद्रकांत कुशारे ,तसेच पिंपळगाव बसवंत पत्रकार संघाचे अध्यक्ष गिरीशबिडवाई यांनी व पदाधिकाऱ्यानी अभिनंदन केले.
Poet Laxman Mahadik Book Amravati University