मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पोको या भारतातील सर्वात विश्वसनीय ग्राहक तंत्रज्ञान ब्रँडने फक्त फ्लिपकार्टवर नवीन पोको एम७ प्लस ५जीच्या पहिल्या विक्रीला सुरूवात केली आहे. विशाल ७००० एमएएच सिलिकॉन-कार्बन बॅटरी, आकर्षक ६.९ इंच एफएचडी+ १४४ हर्ट्झ डिस्प्ले आणि कार्यक्षम स्नॅपड्रॅगन ६एस जेन ३ प्रोसेसर असलेला हा पॉवर-पॅक स्मार्टफोन १५,००० रूपयांपेक्षा कमी किमतीत नवीन मापदंड स्थापित करतो. या स्मार्टफोनची सुरूवातीची किंमत ६ जीबी + १२८ जीबी व्हेरिएण्टसाठी १२,९९९ रूपये आणि ८ जीबी + १२८ जीबी व्हेरिएण्टसाठी १३,९९९ रूपये आहे.
लाँच ऑफरचा भाग महणून ग्राहक एचडीएफसी, एसबीआय किंवा आयसीआयसीआय बँक कार्ड्सचा वापर करत १,००० रूपयांच्या त्वरित बँक सूटचा किंवा पात्र डिवाईसेसवर १,००० रूपयांच्या अतिरिक्त एक्स्चेंज बोनसचा लाभ घेऊ शकतात. या मर्यादित कालावधीच्या ऑफर्स पोको एम७ प्लसला त्याच्या श्रेणीमधील सर्वात लक्षवेधक निवड बनवतात, जेथे सर्वोत्तम कार्यक्षमता आणि आकर्षक लाँच किंमत एकत्र करण्यात आले आहेत.
पोको एम७ प्लस ५जी अविरत मनोरंजनासाठी योग्य निवड:
- दिवस-रात्र कार्यरत राहण्याची खात्री: श्रेणीमधील सर्वात मोठी ७००० एमएएच सिलिकॉन कार्बन बॅटरी जवळपास १६०० चार्ज सायकल्स देते, तसेच जवळपास ४ वर्षांपर्यंत टिकते आणि १८ वॅट रिव्हर्स चार्जिंग इतर डिवाईसेसना देखील चार्ज करते.
- कधीही सर्वोत्तम व्युईंगचा अनुभव: श्रेणीमधील सर्वात मोठ्या ६.९ इंच एफएचडी+ डिस्प्लेसह १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेट सहजपणे चित्रपट, गेमिंग व सोशल स्क्रॉलिंगचा आनंद देतो.
- दीर्घकाळपर्यंत टिकणारी कार्यक्षमता: स्नॅपड्रॅगन ६एस जेन ३ च्या शक्तीसह जवळपास १६ जीबी टर्बो रॅम असलेला एम७ प्लस ५जी विनाव्यत्यय अॅप्स सहजपणे कार्यरत ठेवतो.
- दीर्घकाळापर्यंत टिकण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे: २ ओएस जनरेशन्स + ४ वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स, आयपी६४ धूळरोधक व जलरोधक आणि ४८ महिने विनाव्यत्यय अनुभव टिकाऊपणा व विश्वसनीयतेची खात्री देतात.
वरील विशेष किमतींचा फायदा घ्या. पोको एम७ प्लसच्या विक्रीला १९ ऑगस्ट दुपारी १२ वाजल्यापासून फक्त फ्लिपकार्टवर सुरूवात होत आहे.