मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पोको या भारतातील आघाडीच्या ग्राहक तंत्रज्ञान ब्रँडने किफायतशीर स्मार्टफोन श्रेणीमधील नवीन स्मार्टफोन ‘पोको एम७ प्लस ५जी’च्या लाँचची घोषणा केली. नॉन-स्टॉप मनोरंजन आणि दीर्घकाळपर्यंत कार्यक्षमतेसाठी डिझाइन करण्यात आलेला एम७ प्लस ५जी श्रेणीमध्ये अग्रस्थानी आहे. या स्मार्टफोनमध्ये विशाल ७००० एमएएच सिलिकॉन कार्बन बॅटरी आणि १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेटचे पाठबळ असलेला ६.९-इंच एफएचडी+ डिस्प्ले आहे, ज्यामुळे हा स्मार्टफोन दिवसभरातील मनोरंजनासाठी उत्तम सोबती आहे. या स्मार्टफोनची किंमत फक्त १२,९९९ रूपये आहे.
पोको एम७ प्लस ५जी विनासायास मल्टीटास्किंगसाठी स्नॅपड्रॅगन ६एस जेन ३ सह सर्वोत्तम कार्यक्षमता देतो, तसेच या स्मार्टफोनमध्ये जवळपास १६ जीबी टर्बो रॅक आहे. १४४ हर्टझ रिफ्रेश रेटमधील सुलभ स्क्रॉलिंग, सर्वोत्तम गेमिंग आणि विनासायास सोशल मीडिया ब्राऊजिंगची खात्री मिळते.
या स्मार्टफोनमधील ७००० एमएएच सिलिकॉन कार्बन बॅटरी श्रेणीमधील सर्वात मोठी आहे, जी १६०० चार्ज चक्रांसाठी डिझाइन करण्यात आली आहे, चार तास स्मार्टफोन वापरल्यानंतर देखील जवळपास ८० टक्के क्षमता कायम ठेवते. १८ वॅट रिव्हर्स चार्जिंग असलेला एम७ प्लस ५जी पॉवर बँकप्रमाणे दुप्पट काम करतो, ज्यामुळे फक्त फोन नाही तर दिवसभर इतर डिवाईसेसना देखील पॉवर मिळते.
पोको व शाओमी इंडियाचे मुख्य व्यवसाय अधिकारी संदीप सिंग अरोरा म्हणाले, ”पोको एम७ प्लस ५जी सह आमची आधुनिक काळातील मनोरंजनपूर्ण जीवनशैलीसाठी निर्माण करण्यात आलेला डिवाईस, तुमच्या व्यस्त कामकाजासाठी अनुकूल असलेला, दीर्घकाळपर्यंत मनोरंजनाचा आनंद देणारा आणि सर्वात मागणीदायी अॅप्स असलेला फोन डिझाइन करण्याची महत्त्वाकांक्षा होती. श्रेणीमधील सर्वात मोठ्या क्षमतेची बॅटरी, सर्वात मोठा डिस्प्ले आणि सर्वोच्च रिफ्रेश रेट, तसेच दीर्घकाळपर्यंत टिकाऊपणासह एम७ प्लस ५जी तुम्हाला अधिकाधिक क्षमता देतो; या स्मार्टफोनमध्ये कार्यक्षमता व मनोरंजनाचे परिपूर्ण संयोजन आहे, जे वापरकर्त्यांच्या १५ हजार रूपयांच्या आतील किंमत श्रेणीबाबत असलेल्या अपेक्षांना नव्या उंचीवर घेऊन जाते.”
एम७ प्लस ५जी मध्ये २ ओएस जनरेशन्स, ४ वर्षांच्या सिक्युरिटी अपडेट्ससह आयपी६४ धूळरोधक व जलरोधक आणि प्रीमियम ग्रिड डिझाइनसह मॅट फिनिश आहे. हा स्टायलिश व टिकाऊ स्मार्टफोन आहे. ५० मेगापिक्सल एआय रिअर कॅमेरा असलेला एम७ प्लस ५जी कोणत्याही प्रकाशामध्ये सुस्पष्ट व आकर्षक फोटो व व्हिडिओज कॅप्चर होण्याची खात्री देतो.
पोको एम७ प्लसच्या विक्रीला फक्त फ्लिपकार्टवर १९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजल्यापासून सुरूवात होईल. या स्मार्टफोनची सुरूवातीची किंमत ६ जीबी + १२८ जीबी व्हेरिएण्टसाठी १२,९९९ रूपये* आणि ८ जीबी + १२८ जीबी व्हेरिएण्टसाठी १३,९९९ रूपये* आहे.
लाँच ऑफरचा भाग म्हणून ग्राहक एचडीएफसी, एसबीआय किंवा आयसीआयसीआय बँक कार्डचा वापर करत १,००० रूपयांच्या त्वरित बँक सूटचा किंवा डिवाईसवर १,००० रूपयांच्या अतिरिक्त एक्स्चेंज बोनसचा लाभ घेऊ शकतात. या मर्यादित कालावधीच्या ऑफर्स पोको एम७ प्लसला त्याच्या श्रेणीमधील सर्वात लक्षवेधक निवड बनवतात, जेथे शक्तिशाली कार्यक्षमता आणि आकर्षक लाँच किंमत एकत्र करण्यात आले आहेत. अटी व शर्ती लागू.
पोको एम७ प्लस ५जी: खरा एंटरटेनर
- दीर्घकाळपर्यंत मल्टीटास्किंगची व मनोरंजनाची खात्री: श्रेणीमधील सर्वात मोठी ७००० एमएएच सिलिकॉन कार्बन बॅटरी अनेक तासांपर्यंत स्ट्रिमिंग, गेमिंग व चॅट करण्याचा आनंद मिळण्याची खात्री देते, जेथे स्मार्टफोनचे चार्जिंग संपण्याबाबत चिंता करण्याची गरज भासत नाही.
- पॉवर शेअर करतो: १८ वॅट रिव्हर्स चार्जिंगसह हा स्मार्टफोन पॉवर बँकप्रमाणे दुप्पट काम करतो, जेथे इतर डिवाईसेसना देखील चार्जिंगसाठी पॉवर देतो.
- सर्वोत्तम व्हिज्युअल्स: श्रेणीमधील सर्वात मोठ्या ६.९ इंच एफएचडी+ डिस्प्लेसह १४४ हर्टझ रिफ्रेश रेट सहजपणे चित्रपट, क्रीडा व गेम्सचा आनंद देतो.
- दीर्घकाळपर्यंत टिकणारी कार्यक्षमता: स्नॅपड्रॅगन ६एस जेन ३ च्या शक्तीसह जवळपास १६ जीबी टर्बो रॅक असलेला एम७ प्लस ५जी कार्यक्षमपणे मल्टीटास्किंगची हाताळणी करतो.
- दीर्घकाळपर्यंत टिकण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे: २ ओएस जनरेशन्स, ४ वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स आणि आयपी६४ संरक्षण पावसात किंवा प्रखर सूर्यप्रकाशामध्ये विनाव्यत्यय मनोरंजनाचा आनंद देतात.