मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तुम्हाला स्मार्टफोन अपग्रेड करायचा असेल तर तो क्षण आता आला आहे. पोको हा भारतातील झपाट्याने विकसित होणारा ऑनलाइन स्मार्टफोन ब्रँड सासा लेले सेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फ्लिपकार्टच्या बिग सेव्हिंग्ज डेज २०२५ साठी किमतींमधील आतापर्यंतची सर्वात मोठी सूट सादर करत आहे. ८ मे पर्यंत सर्वात कमी किमतींमध्ये पोकोचे सर्वाधिक विक्री होणारे स्मार्टफोन्स पोको सी७१, पोको सी७५, पोको एम७, पोको एम७ प्रो, पोको एम६ प्लस, पोको एक्स७, पोको एक्स७ प्रो आदी या सेलमध्ये ग्राहकांना खरेदी करता येतील.
सेगमेंटमधील सर्वात मोठ्या ६.८८ इंच एचडी+ डिस्प्लेसह १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट, अँड्रॉइड १५, टीयूव्ही आय प्रोटेक्शन आणि १२ जीबी रॅमसह बजेट ब्रिलियन्स पोको सी सिरीजमधील पोको सी७१ (४+६४) एअरटेल ५,७९९ रुपयांत तर पोको सी७१ (४+६४) ६,४९९ रुपयांत आणि पोको सी७१ (६+१२८) ७,२९९ रुपयांत उपलब्ध आहे. स्नॅपड्रॅगन ४एस जेन २ (४ एनएम), ५० मेगापिक्सल सोनी कॅमेरा आणि आयपी५२-रेटेड डिझाइनसह सर्वात किफायतशीर ५जी स्मार्टफोन पोको सी७५ सीरिजमधील पोको सी७५ (४+६४) आणि पोको सी७५ (४+१२८) अनुक्रमे ७,६९९ व ८,४९९ रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
स्नॅपड्रॅगन ४ जेन २, ६.८८ इंच डिस्प्ले, ५० मेगापिक्सल सोनी कॅमेरा, ५१६० एमएएच बॅटरी आणि जवळपास १२ जीबी रॅमसह भारतातील १० हजार रूपयांखालील सर्वात गतीशील ५जी स्मार्टफोन पोको एम७ सिरीजमधील पोको एम७ (६+१२८) आणि पोको एम७ (८+१२८) अनुक्रमे ९,४९९ आणि १०,६९९ रुपयांत उपलब्ध आहेत. ६.७९ इंच एफएचडी+ १२० हर्ट्झ डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ४ जेन २ एई, १०८ मेगापिक्सल कॅमेरा, हायपरओएस, ३३ वॅट फास्ट चार्जिंग वैशिष्ट्यांसह पोको एम६ प्लस (६+१२८) आणि पोको पोको एम६ प्लस (८+१२८) अनुक्रमे ९,९९९ आणि १०,९९९ रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
६.६७ इंच जीओएलईडी एफएचडी+ एमएमओएलईडी (२१०० नीट्स)सह श्रेणीमधील ब्राइटेस्ट डिस्प्ले, ५० मेगापिक्सल सोनी एलवायटी-६००, ५११० एमएएच बॅटरी आणि ४५ वॅट फास्ट चार्जिंग आदी वैशष्ट्यांसह पोको एम७ प्रो (६+१२८) आणि (८+२५६) अनुक्रमे ११,९९९ आणि १३,९९९ या सवलतीच्या दरांत उपलब्ध आहेत. सेगमेंटमधील सर्वात शक्तिशाली १.५के एएमओएलईडी ३डी कर्व्ह डिस्प्ले, मीडियाटेक डायमेन्सिटी ७३०० अल्ट्राची शक्ती, ५५०० एमएएच बॅटरी आणि ५० मेगापिक्सल सोनी एलवायटी-६०० कॅमेरासह पोको एक्स७ ५जी (८+१२८) आणि (८+२५६) अनुक्रमे १५,९९९ आणि १७,९९९ या सवतीच्या दरात उपलब्ध आहेत.
मीडियाटेक डायमेन्सिटी ८४०० अल्ट्रा, ६५०० एमएएच बॅटरी, ५० मेगापिक्सल सोनी एलवायटी-६०० कॅमेरा आणि हायपरओएस २.० यांसारख्या वैशिष्ट्यांसह सेगमेंटमधील सर्वात शक्तिशाली फोन पोको एक्स७ प्रो (८+२५६) आणि (१२+२५६) हे अनुक्रमे २२,९९९ आणि २४,९९९ रुपयांत खरेदी करता येतील. स्नॅपड्रॅगन ८एस जेन ३ स्मार्टफोनसह ६.६७ इंच ओएलईडी १.५के डिस्प्ले, ५० मेगापिक्सल ड्युअल कॅमेरा, हायपरओएस (अँड्रॉइड १४) आणि ९० वॅट चार्जिंग आदी वैशिष्ट्यांसह पोको एफ६ (१२+२५६) २२,९९९ या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे.
पोको यंदा उन्हाळ्यामध्ये मूल्याला नवीन आकार देत आहे, ज्यामुळे तुम्ही सर्वोत्तम पोको फोन डिल्स, फ्लॅगशिप किलर स्मार्टफोन्स किंवा बजेट ५जी अँड्रॉइड फोन्सचा शोध घेत असला तर येथे इंटरनेट स्क्रॉलिंग करणे थांबवा आणि खरेदी करण्यास सुरूवात करा.