मुंबई – आजच्या काळात सोन्याची देखरेख ठेवणे कठीण झाले आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या सुरक्षेबाबात लोक नेहमीच चिंतीत असतात. अनेक बँका लॉकरची सुविधा देतात, परंतु त्याच्या बदल्यात बँका भाडेही घेतात. पण तुम्हाला घरात असलेल्या सोन्याच्या देखरेखीच्या चिंतेतून मुक्त व्हायचे असेल तसेच त्यावर कमवायची इच्छा असेल, तर पंजाब नॅशनल बँक तुम्हाला एक चांगली संधी देत आहे. सोने मुदत ठेवीत (फिक्स डिपॉझिट) पूर्णपणे सुरक्षित राहते तसेच त्यातून तुम्ही पैसेही कमवू शकतात.
पंजाब नॅशनल बँकेने एका ट्विटमध्ये म्हटले, की ‘तुमचे दागिने मुदत ठेवीत ठेवा आणि गोल्ड मोनिटायझेशन या योजनेअंतर्गत पैसे कमवा’. परदेशातून सोने कमीत कमी आयात करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गोल्ड मोनिटायझेशन योजना सुरू केली आहे.
या योजनेचे फायदे
ही योजना एफडीसारखीच आहे. बँकेत तुम्हाला सोने ठेवावे लागेल. त्यावर तुम्हाला व्याज मिळेल. एफडी मॅच्युअर झाल्यानंतर सोने किंवा त्यावरील पैसे व्याजासकट मिळतात. गोल्ड एफडी संयुक्त खात्यात उघडली जाऊ शकते. सोन्याचे वेगवेगळे प्रकार जसे काही दागिने किंवा नाणे किंवा सोन्याने बनलेल्या काही वस्तू यामध्ये गुंतवू शकता. कमीत कमी १० ग्रॅम सोन्याची गुंतवणूक करावी लागते. एक ते १५ वर्ष अशी या योजनेची मुदत आहे.
एका वर्षाच्या एफडीवर ०.५० टक्के व्याज
एका वर्षाहून अधिक आणि दोन वर्षापर्यंतच्या सोन्याच्या एफडीवर ०.६० टक्के
दोन वर्षांहून अधिक आणि तीन वर्षांपर्यंतच्या सोन्याच्या एफडीवर ०.७५ टक्के
मीडियम टर्म डिपॉझिटवर २.२५ टक्के वार्षिक व्याज
मीडियम टर्म डिपॉझिटवर २.५० टक्के वार्षिक व्याज
वार्षिक व्याजाच्या दराचा लाभ घेणार्या ग्राहकांना सिंपल इंटरेस्ट रेटअंतर्गत पैसे क्रेडिट होतील. परंतु मॅच्युरिटीच्या वेळी व्याज घेऊ इच्छित असाल तेव्हाच्या स्थितीत तुम्हाला कंपाउंड इंटरेस्टअंतर्गत पैसे मिळतील.
https://twitter.com/pnbindia/status/1427835896238379008