अयोध्या (उत्तर प्रदेश) – पंजाब नॅशनल बँकेच्या सर्कल ऑफिसमध्ये वर्ग १ अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या श्रद्धा गुप्ता (३०) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. श्रद्धाच्या खोलीतून पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. त्यात आयएएस अधिकारी आणि एका पोलिस अधिकाऱ्यासह तीन अधिकाऱ्यांच्या नावांचा समावेश आहे.
सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, ‘पापा-मम्मी, माझ्या आत्महत्येचे कारण विशेष सुरक्षा बलाचे प्रमुख विवेक गुप्ता, आशिष तिवारी (लखनऊ) आणि पोलीस अधिकारी अनिल रावत (फैजाबाद) हे तिघे आहेत. यासाठी मला माफ करा’. अयोध्येतील ख्वासपुरा येथील एका घरात ही बँक अधिकारी भाड्याने राहत होती, ती मूळची लखनौच्या राजाजीपुरमची रहिवासी होती. तर त्याचे वडील राजकुमार गुप्त हे कापड दुकान चालवतात.
श्रद्धा ही २०१७ पासून पीएनबीच्या रीडगंज येथील सर्कल ऑफिसमध्ये कार्यरत होती. शुक्रवारी सायंकाळपासून कुटुंबीयांनी तिला मोबाईलवर फोन केला, पण तिने तो रिसिव्ह केला नाही. शिवाय व्हॉटसअॅपवर ती ऑनलाइन असल्याचे दिसले नाही. अखेर घरच्यांनी काळजीपोटी घरमालकाला फोन शनिवारी सकाळी केला. तेव्हा घरमालकाने बँक अधिकाऱ्याच्या खोलीत खिडकीतून पाहिले असता श्रद्धाचा पाय लटकत असल्याचे दिसले. घरमालकाने याबाबत कुटुंबीयांना माहिती देऊन तातडीने तेथे बोलविले. श्रद्धाच्या कुटुंबियांबरोबरच पोलीस पथकही घटनास्थळी पोहोचले. नातेवाइकांच्या उपस्थितीत पोलिसांनी खोलीचा दरवाजा तोडला. तर, श्रद्धाचा मृतदेह फासावर लटकलेला आढळून होता.
आत्महत्येमागील कारण स्पष्ट झाले असून, पोलिसांना मृताच्या खोलीतून सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये तीन जणांच्या मृत्यूला जबाबदार धरण्यात येत आहे. सुसाईड नोटमध्ये विवेक गुप्ता नाव लिहिले आहे, त्याच्यासोबत श्रद्धाच्या लग्नाची चर्चा होती, पण ते होऊ शकले नाही. याशिवाय दुसरे नाव आशिष तिवारी असून ते एसएसएफ प्रमुख लखनऊचे आहे. आणि तिसरे नाव अनिल रावत असून ते फैजाबाद येथील पोलीस विभागात आहेत. आतापर्यंत पोलीस आत्महत्येचा स्पष्ट खुलासा करू शकलेले नाहीत. त्यामुळे सुसाईड नोटच्या आधारे पोलिस लवकरच आत्महत्येचे कारण स्पष्ट करतील, अशी अपेक्षा आहे. अयोध्येचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक शैलेश कुमार पांडे यांनी सांगितले की, तरुणीच्या वतीने आत्महत्येच्या घटनेची चौकशी करण्यात येत आहे. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यात आले आहे. पीएम रिपोर्ट आणि पुराव्यांच्या आधारे कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. सापडलेल्या सुसाईड नोटची चौकशी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.