नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील लता मंगेशकर चौकाचे उद्घाटन केल्याबद्दल स्व. लता मंगेशकर यांचे धाकटे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांनी धन्यवाद देताना केलेल्या ट्विटचे आदरपूर्वक आभार मानले आहेत. लता दीदी भगवान श्री राम यांच्या निस्सीम भक्त होत्या आणि अयोध्येच्या पवित्र नगरीत त्यांच्या नावाने चौक असणे योग्यच आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधानांनी दिली आहे. हृदयनाथ मंगेशकर यांच्या ट्विटचा संदर्भ देत पंतप्रधानांनी ट्विट केले आहे;
“लता दीदी भगवान श्री राम यांच्या निस्सीम भक्त होत्या आणि अयोध्या या पवित्र नगरीत त्यांच्या नावाने चौक असणे अगदी योग्यच आहे.”
https://twitter.com/narendramodi/status/1575506167757164544?s=20&t=w_34YsKjw312OpYv3ASnIw