इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आरोग्याच्या कारणामुळे हा राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. जगदीप धनघट यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहलेल्या पत्रात सविस्तर राजीनाम्याचे कारण देत पुढे म्हटले आहे की, माझ्या कार्यकाळात आपण दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि आमच्याशी असलेल्या शांत आणि सुंदर कार्य संबंधांबद्दल मी भारताच्या माननीय राष्ट्रपतींचे मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे त्यांनी मी माननीय पंतप्रधान आणि आदरणीय मंत्रिमंडळाचे मनापासून आभार मानतो. पंतप्रधानांचे सहकार्य आणि पाठिंबा अमूल्य आहे आणि मी माझ्या कार्यकाळात बरेच काही शिकलो असे म्हटले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुध्दा प्रतिक्रिया समोर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगदीप धनखड यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की जगदीप धनखड यांना देशाच्या उपराष्ट्रपती पदासह इतर अनेक पदांच्या माध्यमातून आपल्या देशाची सेवा करण्याची संधी मिळाली .
एक्स मंचावर पाठवलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात: “जगदीप धनखड यांना देशाच्या उपराष्ट्रपती पदासह इतर अनेक पदांच्या माध्यमातून आपल्या देशाची सेवा करण्याची संधी मिळाली. त्यांना माझ्यातर्फे उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा.”