इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिवंगत जेष्ठ अभिनेते राज कपूर यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त बुधवारी कपूर कुटुंबियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. १४ डिसेंबरला जयंती आहे. या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी कपूर कुटुंबियांना भेटले. यावेळी कपूर कुटुंबियांनी पंतप्रधांनाबरोबर मनमोकळेपणाने संवाद साधला.
या भेटीत रणबीर कपूर, आलिया भट्ट, रिमा कपूर, सैफ अली खान, करीन कपूर, नीतू कपूर, करिश्मा कपूर, अरमान जैन, निखिल नंदा, रिद्दीमा कपूर साहनी, भरत साहनी उपस्थित होते. याभेटीनंतर पंतप्रधान मोदी यांनी या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडिओबरोबरच त्यांनी कॅप्शनमध्ये लिहले आहे की, या वर्षी आम्ही अभिनेता राज कपूर यांची जन्मशताब्दी साजरी करत आहोत. सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल केवळ भारतातच नव्हे तर जगभरात त्यांचे कौतुक केले जाते. मला त्यांच्या कुटुंबियांना भेटण्याची संधी मिळाली. ही आहेत हायलाइट्स…