नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय चलनामध्ये आता थेट ७५ रुपयांचे नाणे येणार आहे. सद्यस्थितीत भारतीय बाजारात १, २, ५, १० आणि २० रुपयांचे नाणे आहे. आता ७५ रुपयांचेही नाणे चलनात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, संध्याकाळी सुमारे ५.४५ वाजता नवी दिल्ली इथल्या करिअप्पा परेड ग्राउंडवर वार्षिक एनसीसी पीएम रॅलीला संबोधित करतील. त्यावेळी ते नवे नाणे राजी करतील.
यंदा एनसीसी (नॅशनल कॅडेट कॉर्प्स) आपल्या स्थापनेचे ७५ वे वर्ष साजरे करत आहे. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान एनसीसीच्या ७५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीच्या स्मरणार्थ विशेष डे कव्हर आणि खास घडवण्यात आलेले रुपये ७५/- मूल्याचे नाणे जारी करतील. यावेळी दिवस-रात्रीची एक रॅली आयोजित केली जाईल, ज्यामध्ये ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम असतील. वसुधैव कुटुंबकम या भावनेला अनुसरून, १९ देशांमधील १९६ अधिकारी आणि कॅडेट्सना या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
PM Narendra Modi Will Release 75 Rupees Coin Today