इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेशातील उन्नावच्या पूर्वा विधानसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. या सभेच्या मंचावर पंतप्रधान मोदींनी असे काही केले की, समोर बसलेले शेकडो जण काही क्षण स्तब्ध झाले. मोदींनी मंचावर सर्वांसमोर जिल्हाध्यक्षांच्या पायाला स्पर्श केला. मंचावर उपस्थित भाजप नेते, पदाधिकारी आणि उमेदवारही यामुळे अवाक झाले. तसेच, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात व्हायरल झाला आहे.
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत, रविवारी उन्नावच्या पूर्वा विधानसभा मतदारसंघातील चंदनखेडा सिक्री मोड मैदानावर एक जाहीर सभा होती, ज्याला संबोधित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी तीनच्या सुमारास पोहोचले. पंडालमधून मंचावर आल्यावर त्यांनी उपस्थित नेत्यांना हात जोडून अभिवादन केले. ते बसायला निघाले तेव्हा शेजारीच असलेले जिल्हा पंचायत अध्यक्ष सकुन सिंग यांनी त्यांच्या पायाला स्पर्श करत त्यांनी स्वागत केले. दरम्यान, उन्नावचे जिल्हाध्यक्ष अवधेश कटियार यांनी त्यांच्या पायाला स्पर्श करण्याच्या प्रयत्नात पूर्णपणे नतमस्तक झाले. त्यावर पंतप्रधानांनी सहजता दाखवत त्यांना दोन्ही हातांनी धरून दोन क्षण काहीतरी समजावून सांगितले आणि अचानक मंचावरील सर्वांसमोर पीएम मोदींनी जिल्हाध्यक्षांच्या पाया पडून त्यांना स्पर्श केल्याची चर्चा रंगू लागली. नंतर जेव्हा लोकांना संपूर्ण घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांगुलपणाचे सगळेजण कौतुक करायला लागले. पंडालमध्येही मोदी मोदी अशा घोषणा दिल्या जाऊ लागल्या. मंचावर पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करतानाचा व्हिडिओ इंटरनेट मीडियाच्या व्हॉट्सअॅप सोशल प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
https://twitter.com/BJP4UP/status/1495407895290138625?s=20&t=1XCCYPbsknkSpgrSsnd4hg
मोदींची ही कृती पाहून क्षणभर जिल्हाध्यक्षही स्तब्ध झाले आणि पंडालमध्ये बसलेले लोक हे दृश्य पाहून थक्क झाले, पण पंतप्रधानांच्या स्वभावाची आधीच ओळख असलेल्या नेत्यांना समजायला वेळ लागला नाही. व्यासपीठावर उपस्थित नेते, पदाधिकारी आणि उमेदवारांनाही पंतप्रधानांची ही सहजता पटली. याबाबत जिल्हा पंचायत अध्यक्ष सकुन सिंह यांनी सांगितले की, मी मोदीजींच्या स्वागतासाठी पायाला हात लावण्यासाठी वाकत होतो. तेव्हा त्यांनी मला थांबवले आणि समजावून सांगायला सुरुवात केली. दरम्यान, जिल्हाध्यक्ष अवधेश कटियार यांनी त्यांच्या पायाला हात लावायला सुरुवात केली, तेव्हा मोदीजींनी त्यांना दोन्ही हातांनी पकडून वर केले. यानंतर त्यांना काही समजावून सांगितल्यानंतर जिल्हाध्यक्षांच्या पायाजवळ धरती मातेला स्पर्श करून दोन्ही हातांनी नतमस्तक झाले.