नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या पहिल्या राज्य दौऱ्यासाठी दिल्लीहून रवाना झाले आहेत. ते २१ ते २३ जून दरम्यान अमेरिका दौऱ्यावर असतील. पंतप्रधानांच्या अधिकृत दौऱ्याची सुरुवात २१ जून रोजी सकाळी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात योग दिनाच्या सोहळ्याने होईल. दरम्यान, या दौऱ्यात पंतप्रधान मोदी जवळपास २४ प्रमुख मान्यवरांना भेटणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये नोबेल पारितोषिक विजेते, अर्थशास्त्रज्ञ, कलाकार, शास्त्रज्ञ, विद्वान, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ, आरोग्य तज्ञ इत्यादींचा समावेश आहे.
पंतप्रधान मोदी या लोकांना भेटणार आहेत
टेस्लाचे सह-संस्थापक इलॉन मस्क, खगोलभौतिकशास्त्रज्ञ नील डीग्रास टायसन, ग्रॅमी पुरस्कार विजेती भारतीय-अमेरिकन गायिका फाल्गुनी शाह हे २४ प्रमुख लोकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात भेटतील. याशिवाय ते पॉल रोमर, निकोलस नसिम तालेब, रे डॅलिओ, जेफ स्मिथ, मायकेल फ्रोमन डॅनियल रसेल, एल्ब्रिज कोल्बी आणि डॉ. पीटर आग्रे, डॉ. स्टीफन क्लास्को आणि चंद्रिका टंडन यांनाही भेटतील.