इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क आणि पंतप्रधान मोदी यांची अमेरिकेत भेट झाली. दोघांच्या भेटीनंतर टेस्लाच्या इलेक्ट्रिक कार भारतात उपलब्ध होणार का, टेस्ला भारतात गुंतवणूक करणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी अनेक सेलिब्रिटींना भेटत आहेत. याच क्रमाने पीएम मोदी आणि टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांचीही भेट झाली. या दोघांच्या भेटीचा फोटोही पीएम मोदींच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टेस्ला लवकरच भारतात दाखल होऊ शकते. इलॉन मस्क यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर ही माहिती दिली आहे. मला भारतात लवकरात लवकर गुंतवणूक करायची आहे, असे त्यांनी सांगितले. पत्रकारांनी विचारल्यानंतर मस्क म्हणाले की मला खात्री आहे की, टेस्ला भारतात असेल आणि ते लवकरच मानवी दृष्ट्या शक्य होईल. यासोबत ते म्हणाले की, मी पंतप्रधान मोदींच्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानू इच्छितो आणि आशा आहे की आम्ही भविष्यात काही घोषणा करू शकू. यासोबतच मस्कने सांगितले की, ते पुढील वर्षी भारताला भेट देऊ शकतात.
अमेरिकेत पंतप्रधान मोदींना भेटण्यापूर्वीच इलॉन मस्क यांनी भारतात येण्याबाबत बोलले आहे. याआधी मस्क म्हणाले होते की कंपनी लवकरच भारतीय बाजारपेठेत प्रवेश करू शकते. मुलाखतीदरम्यान, टेस्लाला भारतात नवीन कारखाना सुरू करण्यात रस आहे का, असे विचारले असता, मस्कने होकारार्थी उत्तर दिले.
अलीकडेच टेस्लाच्या काही अधिकाऱ्यांनी भारतीय बाजारपेठेला भेट देऊन शक्यता जाणून घेतल्या होत्या. यादरम्यान अधिकाऱ्यांनी भारत सरकारच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेतली होती. रिपोर्ट्सनुसार, टेस्लाच्या अधिकाऱ्यांनी भारतात मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आणि R&D युनिट स्थापन करण्याबाबत चर्चा केली होती.