नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा दूरध्वनी आला. गेल्या आठवड्यात अलास्का येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या भेटीबद्दलचे त्यांचे विचार राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी सामायिक केले.
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे आभार मानून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघर्षावर मुत्सद्देगिरी आणि संवादाच्या माध्यमातून शांतातापूर्ण रीतीने तोडगा काढण्याची भारताची सातत्यपूर्ण भूमिका अधोरेखित केली. यासंदर्भातील प्रयत्नांना भारताचा पूर्ण पाठिंबा असेल असा पुनरुच्चार त्यांनी केला.
भारत आणि रशिया यांच्यातील विशेष आणि धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्याच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी सहमती दर्शवली.