नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी देण्यात येणाऱ्या SPG सुरक्षाव्यवस्थेतील श्वान पथकात आता मुधोळचे श्वान समाविष्ट करण्यात येणार आहे. मुधोळ हाऊंड्स नावाने कुत्र्यांची ही जात प्रसिद्ध आहे. मुधोल हाऊंड हे आधीच भारतीय हवाई दल आणि इतर सरकारी विभागात सेवा देत आहेत परंतु पंतप्रधानांच्या सुरक्षा दलात त्यांचा समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मुधोळ हाऊंड शिकार आणि सुरक्षा करण्यासंबंधीत कौशल्यामुळे अत्यंत लोकप्रिय आहेत. मुधोळ हाऊंड कुत्रे अत्यंत वेगाने धावू शकतात. यांची हालचाल अतिशय चपळ असते. यांच्यातील उर्जा, तीक्ष्ण नजर आणि गंध ओळखण्याची क्षमता खूप जास्त आहे. मराठा साम्राज्यातील मालोजीराव घोरपडे याच मुधोळवर राज्य करत होते. हा श्वान अद्याप लहान आहे. त्याला प्रथम प्रशिक्षण द्यावे लागेल. चार महिन्यांच्या कठोर प्रशिक्षणानंतर त्याचा संघात समावेश होणार आहे. एप्रिल महिन्यात कॅनाइन रिसर्च अँड इन्फॉर्मेशन सेंटर तिम्मापूरने दोन महिन्यांची दोन नर पिल्ले एसपीजीकडे सुपूर्द केली.
मुधोळ हाऊंड कुत्रे राखणदारी करण्यासाठी साध्या कुत्र्यांच्या तुलनेत प्रचंड हुशार असतात. ते अत्यंत गंभीर व चाणाक्ष असतात. कर्नाटकातील मुधोळ गावात 750 कुटुंब या कुत्र्यांचं पालन करत आहेत. थोडे मोठे झाल्यानंतर या कुत्र्यांची विक्री केली जाते. पण हा कुत्रा दक्षिण भारतात कसा पोहोचला, याची कहाणी अत्यंत रंजक आहे.मध्य आशिया आणि अरेबिया हे मुधोळ हाऊंड प्रजातीचं मूळ स्थान असल्याचं सांगितलं जातं. या परिसरातून हा कुत्रा भारताच्या पश्चिमेपर्यंत आला. पुढे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात तो दाखल झाला. हा कुत्रा याच परिसरात मोठ्या प्रमाणात पाळला जातो.
मुधोळ प्रांताचे राजे श्रीमंत मालोजीराजे घोरपडे यांनी या प्रजातीची सर्वप्रथम दखल घेतली होती. काही आदिवासी लोक या कुत्र्याची प्रजात पाळत असल्याचं त्यांना दिसलं. त्यांनी या कुत्र्याबाबत माहिती घेऊन याला ‘बेडर’ असं नाव दिलं. बेडर म्हणजेच निर्भिड किंवा निडर.सन 1900 च्या सुरुवातीला मुधोळचे महाराज इंग्लंडच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी किंग जॉर्ज पंचम यांना मुधोळ हाऊंड प्रजातीचे दोन कुत्रे भेट स्वरूपात देण्यात आले होते.
भारतीय लष्करानेही या कुत्र्यांमध्ये रस दाखवला आहे. सीमा सुरक्षा आणि तपासकामाच्या माध्यमातून मुधोळ हाऊंड प्रजातीचा उपयोग देशासाठी केला जात आहे. कर्नाटकातील बागलकोट भागातील मुधोळ परिसरात हा कुत्रा आढळतो. मुधोळ हाउंड हा कुत्रा त्याच्या विशेष कार्यशक्ती आणि शिकार करण्याच्या वृत्तीसाठी ओळखला जातो. हा जर्मन शेफर्ड कुत्र्यांपेक्षा वेगवान कुत्रा मानला जातो.
देशी जातीच्या कुत्र्यांमध्ये मुधोळ हाउंड्स ही सर्वात शिकारी गुणवत्ता, निष्ठावान आणि निरोगी प्रजाती मानली जाते. याच कारणामुळे पहिल्यांदाच देशी जातीच्या कुत्र्याला प्रथम भारतीय हवाई दलात आणि आता SPG पथकात समाविष्ट करण्यात आले आहे. मुधोळ हाऊंड्स हरणासारखा उंच, काटक आणि प्रचंड रागीट असतो. ओळखीशिवाय कुणाचाही स्पर्श सहन करत नाही. याचे कान लांब असतात. शेपटी जमिनीपर्यंत पोचते. चेहराही सामान्य कुत्र्यांपेक्षा अधिक निमुळता असतो. ही कुत्री उंचीमुळे इतरांपेक्षा वेगळी दिसतात.
विशेष म्हणजे कोणतेही काम जर्मन शेफर्ड कुत्रे 90 सेकंदात पूर्ण करतात, ते काम मुधोळ हाऊंड्स अवघ्या 40 सेकंदात पूर्ण करतात. मुधोळ हाऊंड्सने इंग्रजांनाही भुरळ पाडल्याचा इतिहास आहे. इंग्लंडचे पाचवे किंग जॉर्ज भारतात आले तेव्हा जे चार जातीचे श्वान दाखवले होते त्यात मुधोळच्या कुत्र्यांचा समावेश होता. असं किंग जॉर्जने म्हटल्यापासून या कुत्र्यांना मुधोळ हाऊंड्स असे नाव पडले.
PM Narendra Modi Security Squad New Dog
Mudhol Hounds Prime Minister