इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या राजस्थान दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात नियोजनानुसार अबू रोड परिसरात सभेला संबोधित करण्यासाठी त्यांना पोहोचायचे होते. मात्र या ठिकाणी पोहोचण्यास त्यांना उशीर झाल्याने नरेंद्र मोदींनी मायक्रोफोन वापरत सभेला संबोधित करण्यास नकार दिला.
नरेंद्र मोदींनी माईकचा वापर न करताच तेथील उपस्थितांशी संवाद साधल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत नरेंद्र मोदी आपण संबोधित करु शकत नसल्याने माफी मागत आहेत. तसंच आपण पुन्हा एकदा सिरोहीला येऊ असं आश्वासनही त्यांनी दिलं. लाऊडस्पीकर संबंधीच्या नियमाचं आपल्याला पालन करायचं आहे असं सांगत मोदींनी सभेला संबोधित करण्यास नकार देत उपस्थितांची माफी मागितली. यावेळी “मला येथे पोहोचण्यास उशीर झाला. मी नियमांचं पालन केलं पाहिजे अशी माझी विवेकबुद्धी मला सांगत आहे. त्यामुळे मी तुम्हा सर्वांची माफी मागत आहे,” असं मोदींनी माईक आणि लाऊडस्पीकरचा वापर न करता उपस्थितांना सांगितलं. पुढे ते म्हणाले “पण मी तुम्हाला आश्वासन देतो की, मी पुन्हा येईल. तुम्ही दिलेलं प्रेम आणि आपुलकीची नक्की परतफेड करेन”. यानंतर नरेंद्र मोदींनी मंचावर वाकून नमस्कार केला आणि ‘भारत माता की जय’ अशी घोषणा दिली.
अनेक भाजपा नेत्यांनीही नरेंद्र मोदींचा सभेतील व्हिडीओ शेअर केला असून नियमांचे पालन केल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं आहे. काँग्रेसची सत्ता असणाऱ्या राजस्थानमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. गुजरातमधील अंबाजी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर नरेंद्र मोदी राजस्थानमध्ये पोहोचले होते. त्यांच्या या सभेला लोकांनी भरभरुन प्रतिसाद देत गर्दी केली होती.
PM Modi decided against addressing the public meeting at Abu Road because it was well past stipulated time.
This was 7th program of the day. Earlier he flagged and took a ride on Vande Bharat and Ahemdabad Metro, prayed at Ambaji among others.
He is 72 and fasting for Navratri! pic.twitter.com/UWiotbehQm
— Amit Malviya (मोदी का परिवार) (@amitmalviya) September 30, 2022
PM Narendra Modi Sabha Video Viral