नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील तब्बल ३ कोटी नागरिकांना २१ तासात नळ कनेक्शन मिळाले आहे. हे वाचून तुम्हीही अचंबित झालात ना. पण, हे खरे आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच स्वतः तशी माहिती दिली आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर काल लोकसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी सभागृहाला सांगितले की, नल जल योजनेचे देशात ८ कोटी लाभार्थी आहेत. यास २१ तास उलटत नाही तोच पंतप्रधान मोदी यांनी आज राज्यसभेमध्ये भाषण केले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, नल जल योजनेचे ११ कोटी लाभार्थी आहेत. त्यामुळे अवघ्या २१ तासात ३ कोटी लाभार्थी वाढल्याचे दिसून येत आहे. हाच धागा पकडून काँग्रेसने मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे.
बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/INCIndia/status/1623620102850740224?s=20&t=ntrLRuzlhDJBUOGAHOAdUg
PM Narendra Modi Parliament Video Viral