नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी आणि शेतीशी संबंधित इतर योजना आपल्या देशातील करोडो शेतकऱ्यांना नवे बळ देत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांचे सामर्थ्य अधोरेखित करताना ते म्हणाले की, शेतकरी बलशाली झाला की देश समृद्ध होतो. पंतप्रधानांनी ट्विट केले आहे, ”आपल्या शेतकरी बंधुभगिनींचा देशाला अभिमान आहे. शेतकरी जितका सशक्त होईल तितकाच नवभारतही समृद्ध होईल. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना आणि शेतीशी संबंधित अन्य योजना देशातल्या करोडो शेतकऱ्यांना नवे बळ देत आहेत.”
शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध होण्यासाठी आणि त्यांना दुप्पट उत्पन्न व्हावे यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. लवकरच पीएम किसानचा ११वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे.
हमारे किसान भाई-बहनों पर देश को गर्व है। ये जितना सशक्त होंगे, नया भारत भी उतना ही समृद्ध होगा। मुझे खुशी है कि पीएम किसान सम्मान निधि और कृषि से जुड़ी अन्य योजनाएं देश के करोड़ों किसानों को नई ताकत दे रही हैं। pic.twitter.com/xMSrBrbLT5
— Narendra Modi (@narendramodi) April 10, 2022