इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांची आई हिराबेन मोदी यांची भेट घेण्यासाठी गांधीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. पंतप्रधान उद्या म्हणजेच ५ डिसेंबर रोजी गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान करणार आहेत. पंतप्रधान अहमदाबादच्या साबरमती विधानसभा मतदारसंघाचे मतदार आहेत.
यापूर्वी, यावर्षी २७ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर अचानक आई हिराबेन यांना भेटण्यासाठी आले होते. साबरमती नदीवरील अटल पुलाचे उद्घाटन आणि खादी उत्सव कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान मोदी गांधीनगरमधील रायसन भागातील त्यांच्या आईच्या निवासस्थानी पोहोचले.
https://twitter.com/ANI/status/1599372441679077376?s=20&t=M4HPAyM_X_7cfJu_Z1w6NA
PM Narendra Modi Mother Meet Voting Gujrat Election