इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चांद्रयान३चे चंद्रावर सुखरुप आणि यशस्वी लँडिंग होताच जगभरात अतिशय आनंद आणि समाधानाचे वातावरण आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुरक्षितरित्या उतरलेले हे पहिलेच यान आहे. याद्वारे भारताने मोठा इतिहास रचला आहे. काही दिवसांपूर्वीच रशियाने लुना२५ हे यान चंद्रावर कोसळले. भारताचेही चांद्रयान२ हे चंद्रावर लँडिंग करतेवेळी कोसळले होते. त्यामुळे चांद्रयान३ कडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. चांद्रयान३ हे चंद्रावर उतरताच सर्वांनी जल्लोष केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या ब्रिक्स परिषदेसाठी दक्षिण अफ्रिकेत आहेत. तेथून त्यांनी चांद्रयान३चे थेट प्रक्षेपण पाहिले. त्यानंतर मोदी यांनी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो)सह देशाला संबोधित केले. सर्वांचे अभिनंदन केले. त्यानंतर काही क्षणातच पंतप्रधान मोदींनी थेट इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांना मोबाईलवर फोन केला.
पंतप्रधान मोदी आणि इस्रो प्रमुख सोमनाथ यांच्यात मोबाईलवर झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात मोदी हे शास्त्रज्ञ सोमनाथ यांचे अभिनंदन केले. त्यांना खुप खुप शुभेच्छा दिल्या. तसेच, इस्रोच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले.
बघा, या दोन्ही मान्यवरांमधील संवादाचा हा व्हिडिओ
PM Narendra Modi Mobile Call to ISRO Chief Somnath
Africa Chandrayaan3 Success