नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा आज 100 वा भाग आहे. त्याचे थेट प्रक्षेपण सुरू झाले आहे. या भागाच्या निमित्ताने भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने देशभरातील विविध वारसा स्थळांवर विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले. मुंबईमध्ये 29 एप्रिलच्या संध्याकाळी ऐतिहासिक स्मारक असलेल्या गेटवे ऑफ इंडिया येथे एक सोहळा साजरा करण्यात आला.
पंतप्रधानांनी ऑक्टोबर 2014 मध्ये सुरू केलेल्या ‘मन की बात’ च्या नावीन्यपूर्ण उपक्रमावर भर देण्यात आला. विविध भागांमधील कहाण्यांचे आकर्षक पद्धतीने कथन करण्यात आले आहे. माननीय पंतप्रधान आणि सामान्य जनता यांच्याकडील कल्पनांची अतिशय सहजतेने उपलब्ध असलेल्या रेडियो या माध्यमाच्या मदतीने देवाणघेवाण करण्याचा हा नावीन्यपूर्ण उपक्रम खरोखरच प्रभावी ठरला आहे.
मन की बात कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासून, ज्यात दसऱ्याच्या दिवशी हृदयातील अशुद्धी काढून टाकण्याच्या संदेश देण्यात आला ते स्थानिक कला आणि कलाकार, पद्म पुरस्कार विजेते ज्यांचा पंतप्रधानांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले हो. 2015 मध्ये, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा त्यांचे विचार सामायिक करण्यासाठी मन की बात कार्यक्रमाच्या एका भागात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे 99 भाग यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत आणि 100 वा भाग आज प्रसारित होत आहे.
बघा, मन की बातचे थेट प्रक्षेपण
'Mann Ki Baat' is an excellent platform for spreading positivity and recognising the grassroot changemakers. Do hear #MannKiBaat100! https://t.co/aFXPM1RyKF
— Narendra Modi (@narendramodi) April 30, 2023
PM Narendra Modi Man ki Baat 100 Episode Live Telecast