रोम (इटली) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या इटली दौऱ्यावर आहेत. तेथे ते १६ व्या G-20 शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. आज सकाळीच त्यांचे रोम येथे आगमन झाले. इटली सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि इटलीतील भारताचे राजदूत यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. रोम शहरातील पिझ्झा गांधी या भागात मोदी हे महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी आले होते. त्याचवेळी तेथील रस्त्याच्या कडेला अनेक मोदी चाहते उपस्थित झाले होते. या सर्वांना भेटण्यासाठी मोदी तेथे गेले. त्यावेळी सर्वांनी मोदी-मोदी असा जयजयकार केला. हा सारा नजारा पाहून रोममधील नागरिक तसेच, अन्य अधिकारी व कर्मचारीही अचंबित झाले. बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/ANI/status/1454041789568978957