नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोनामुळे कामाच्या पद्धतीत मोठे बदल झाले. वर्क फ्रॉम होम म्हणजे घरातूनच काम करण्याची पद्धत समोर आली. कोरोनाचे सावट निवळताच पुन्हा ऑफिसमधील काम सुरू झाले आहे. आता केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत मोठा बदल करण्याची चिन्हे आहेत. चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी तसेच वर्क फ्रॉम होम ही संकल्पना लागू होण्याचा शक्यता आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लेबर कोडमध्ये बदलांचे संकेत दिले आहेत.
नव्या लेबर कोडनुसार कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन विक ऑफ देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र उर्वरित ४ दिवस त्यांना १२ते १२ तास काम करावे लागेल. त्यानंतर घरापासून ऑफिसपर्यंतच्या प्रवासात जाणारा वेळ विचारात घेतल्यास कर्मचार्यांना १४ते १५ तास प्रवास आणि ऑफिसमध्ये घालवावे लागतील. या अडचणीतून वाचण्यासाठी सरकार वर्क फ्रॉम होमच्या इकोसिस्टिमला प्रोत्साहन देण्याचं काम करणार आहे.
कोरोना काळामध्ये नोकऱ्या आणि कंपन्यांना वाचवण्यामध्ये वर्क फ्रॉम होम या मध्यममार्गाने मोठी भूमिका बजावली होती. लॉकडाऊनच्या परिस्थितीत जेव्हा नागरिक घरातून बाहेर पडत नव्हते तेव्हा वर्क फ्रॉम होममुळे ते काम करत राहिले. ज्यामुळे त्यांच्या नोकऱ्या सुरक्षित राहिल्या. तसेच कंपन्यांच्या कामावरही फारसा परिणाम झाला नाही.
या सुविधेचा सर्वाधिक फायदा आयटी सेक्टरमधील लाखो कर्मचाऱ्यांना मिळाला. आयटी कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमच्या मदतीने ग्रोथवर परिणाम होऊ दिला नाही. मात्र आता याच आयटी कंपन्या वर्क फ्रॉम होमची सुविधा संपुष्टात आणत आहेत. टीसीएसने तर आपल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसमध्ये येण्यासाठी थेट अल्टिमेटमच दिलं आहे. अनेकांनी वर्क फ्रॉम होम संपवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या एका सल्ल्यामुळे या कंपन्यांना आपल्या धोरणामध्ये बदल करावा लागण्याची शक्यता आहे. मोदींच्या या सल्ल्यानंतर देशामध्ये नोकरी करण्याची पद्धत एकदम बदलणार आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून नव्या लेबर कोडवर काम सुरू आहे. तसेच तो लागू करण्याचीही चर्चा सुरू आहे. मात्र अनेक डेडलाईननंतरही हा लेबर कोड लागू होऊ शकलेला नाही.
महत्त्वाचे म्हणजे यामुळे तीन दिवसांच्या सुट्टीमुळे कर्मचाऱ्यांना पुढच्या आठवड्यासाठी स्वत:ला तयार करण्याची संधी मिळेल. तसेच त्यामुळे पर्यटनालाही फायदा होईल. प्रत्येक आठवड्याला कुठलाही कर्मचारी तीन दिवस घरी बसून राहणार नाही. तो एक दिवस चित्रपट-रेस्टॉरंट आणि सिंगल डे ट्रिपचा प्लॅन करू शकतो, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
PM Narendra Modi Indication Big Changes in Work Culture
Labor Code