नवी दिल्ली – येत्या 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला उद्देशून करणार असलेल्या भाषणात आपले विचार समाविष्ट करण्यासाठी, सर्वांनी MyGov (mygovindia) पोर्टलवर आपले विचार पाठवावतेत, असं आवाहन करण्यात आलं आहे. पंतप्रधान कार्यालयाने MyGov च्या या आवाहनाला टॅग करत ट्विट केलं आहे- “लाल किल्ल्याच्या बुरुजावरून आपले विचारच प्रतिबिंबित होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात काय मुद्दे असावेत असं आपल्याला वाटतं? @mygov india वर नक्की शेअर करा”
Your thoughts will reverberate from the ramparts of the Red Fort.
What are your inputs for PM @narendramodi’s speech on 15th August? Share them on @mygovindia. https://t.co/UCjTFU30XV
— PMO India (@PMOIndia) July 30, 2021