जम्मू – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिवाळी यंदाही भारतीय जवानांबरोबरच असणार आहे. यंदा ते येथील नौशेरा सेक्टरमध्ये दाखल झाले आहेत. पाकिस्तान सीमेलगत असलेल्या या भागातील जवानांशी जवान संवाद साधणार आहेत. तसेच, त्यांच्यासोबत दिवाळीचा फराळही करणार आहेत. जवानांबरोबर गप्पा तसेच दिवाळीच्या वस्तूही ते जवानांना देणार आहेत. यामुळे जवानांमध्ये मोठा उत्साह आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे परिसरात मोठा कडक बंदोबस्त आहे. या परिसरातील सुरक्षा स्थितीची विस्तृत माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी यावेळी मोदींना दिली. तर, शहीद झालेल्या जवानांना मोदींनी मानवंदना दिली.
https://twitter.com/ANI/status/1456141683498700800