पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधान हे देहूच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यामुळे याठिकाणी भाविकांमध्ये अपूर्व उत्साहाचे वातावरण आहे. देहू येथील जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे.
संत तुकाराम हे वारकरी संप्रदायाचे संत आणि कवी होते, जे त्यांचे अभंग आणि अध्यात्मिक कीर्तनाच्या माध्यमातून केलेल्या समाजाभिमुख पूजनासाठी ओळखले जातात. ते देहू इथे रहायचे. त्यांच्या निधनानंतर एक शिला मंदिर बांधण्यात आलं, पण त्याची औपचारिक रचना देऊळ म्हणून करण्यात आली नव्हती. या मंदिराची 36 शिखरांसह दगडी पुनर्बांधणी करण्यात आली असून त्यामध्ये संत तुकाराम महाराजांची मूर्ती देखील आहे. शिळा मंदिराचा उदघाटन सोहळा सध्या सुरू आहे.
बघा त्याचे हे थेट प्रक्षेपण
सायंकाळी मुंबईत
संध्याकाळी 4:45 च्या सुमाराला पंतप्रधान मुंबई मधील जल भूषण इमारत आणि राज भवन येथील क्रांतिकारक गॅलरीचं उद्घाटन करतील. त्यानंतर संध्याकाळी 6 च्या सुमाराला पंतप्रधान मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात सहभागी होतील.