शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोठ्या घोषणा… परदेशातून थेट इस्रोमध्ये… (व्हिडिओ)

ऑगस्ट 26, 2023 | 10:28 am
in मुख्य बातमी
0
Capture 23

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दक्षिण आफ्रिका आणि ग्रीस या दोन देशांचा दौरा आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंगळुरू येथील एचएएल विमानतळावर आगमन झाले. येथे पंतप्रधान मोदींनी जनतेला संबोधित करताना ‘जय विज्ञान-जय अनुसंधन’ असा नवा नारा दिला. यानंतर पंतप्रधान मोदींनी इस्रो टेलिमेट्री ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये चांद्रयान-3 मोहिमेत सहभागी असलेल्या आयएसओआर टीमच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली. येथे पोहोचल्यावर पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, ‘चांद्रयान-3 च्या यशाने भारताला अभिमान वाटणाऱ्या आमच्या इस्रोच्या वैज्ञानिकांशी संवाद साधण्यासाठी उत्सुक आहोत. अंतराळ क्षेत्रातील आपल्या देशाच्या यशामागे त्यांचे समर्पण आणि उत्कटता हीच खरी प्रेरक शक्ती आहे.

चांद्रयान-3 च्या यशानंतर पंतप्रधान मोदी बेंगळुरूमध्ये इस्रोच्या शास्त्रज्ञांना संबोधित करताना भावूक झाले. यावेळी पंतप्रधान मोदींनी वैज्ञानिकांचे कौतुक करताना थोडावेळ मौन बाळगले आणि भावनांना आवर ठेऊन आपला मुद्दा पुढे केला. शास्त्रज्ञांचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, तुमच्या मेहनतीला, तुमच्या संयमाला सलाम. पीएम मोदी म्हणाले की, हा आजचा भारत आहे, लढाऊ भारत आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, २३ ऑगस्टच्या दिवसाचा प्रत्येक सेकंद माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा फिरत आहे. विक्रम लँडर उतरल्यावर इस्त्रो केंद्रात देशभरातील लोकांनी जल्लोष साजरा केेला, हे दृश्य कोण विसरू शकेल. काही आठवणी अजरामर होतात, ते क्षण अजरामर झाले. चांद्रयान-३ मोहीम ज्या ठिकाणी चंद्रावर उतरली होती ती जागा आता ‘शिव-शक्ती’ म्हणून ओळखली जाईल. २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर भारतीय तिरंगा फडकवण्यात आला होता, त्यामुळे आजपासून हा दिवस भारतात ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ म्हणून साजरा केला जाईल. जेव्हा प्रत्येक घरात तिरंगा असतो तेव्हा प्रत्येक हृदयात तिरंगा असतो आणि आता चंद्रावरही तिरंगा आहे. चांद्रयान-२ मोहिमेचे ठिकाण यापुढे ‘तिरंगा पॉइंट’ म्हणून ओळखले जाईल. हा तिरंगा बिंदू भारताच्या प्रत्येक प्रयत्नाची प्रेरणा बनेल, हा तिरंगा बिंदू आपल्याला शिकवेल की कोणतेही अपयश अंतिम नसते, असे ते म्हणाले.

Interacting with our @isro scientists in Bengaluru. The success of Chandrayaan-3 mission is an extraordinary moment in the history of India's space programme. https://t.co/PHUY3DQuzb

— Narendra Modi (@narendramodi) August 26, 2023

विमानतळाबाहेर स्वागत
बंगळुरूमधील HAL विमानतळाबाहेर जमलेल्या लोकांचे पंतप्रधान मोदींनी स्वागत केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी जनतेला संबोधित केले. ते म्हणाले की, जेव्हा देशाचे शास्त्रज्ञ देशाला एवढी मोठी देणगी देतात, एवढी मोठी कामगिरी करतात, तेव्हा हे दृश्य जे मी बंगळुरूमध्ये पाहतोय, तेच दृश्य मी ग्रीसमध्ये तसेच जोहान्सबर्गमध्येही पाहिले. जगाच्या कानाकोपऱ्यात, केवळ भारतीयच नाही तर विज्ञानावर विश्वास ठेवणारे, भविष्य पाहणारे, मानवतेला समर्पित असणारे लोक अशा आवेशाने आणि उत्साहाने भरलेले आहेत.

मोदी म्हणाले, की तुम्ही लोक इतक्या पहाटे इथे आलात. भारताचे भविष्य असलेली लहान मुलंही इतक्या पहाटे इथे आली आहेत. चांद्रयान-३ च्या ऐतिहासिक लँडिंगच्या वेळी मी परदेशात होतो, पण मी भारतात जाताना आधी बंगळुरूला जाण्याचा विचार केला होता. भारतात जाताच सर्वप्रथम मी शास्त्रज्ञांना नतमस्तक होईन. माझे मन वैज्ञानिकांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप उत्सुक आहे, अशा भावना मोदींनी व्यक्त केल्या.

यापूर्वी पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी स्थानिक कलाकार एचएएल विमानतळाबाहेर रस्त्यावर ढोल वाजवताना आणि नाचताना दिसले. विमानतळाबाहेर भाजपचे कार्यकर्ते आणि नेतेही मोठ्या संख्येने जमले होते. HAL विमानतळाबाहेर जमलेल्या लोकांमध्ये एका स्थानिकाने सांगितले की, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश बनला आहे. शास्त्रज्ञांना जी काही माहिती मिळेल ती भारत आणि जगासाठी एक मोठा मैलाचा दगड ठरेल. तिथून जे काही वैज्ञानिक पुरावे उपलब्ध असतील, त्याच्या मदतीने भारत संपूर्ण जगाला मदत करेल.

PM Narendra Modi Big Announcement ISRO Visit
Tiranga Point Shivshakti 23 August National Day

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पाच वर्षे एकत्र होते, मग बलात्कार कसा? सुप्रीम कोर्टाने फेटाळली महिलेची याचिका…

Next Post

रेल्वेच्या डब्याला भीषण आग… १० ठार, २० जखमी… कॉफी बनविण्याचे ठरले निमित्त…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
Capture 24

रेल्वेच्या डब्याला भीषण आग... १० ठार, २० जखमी... कॉफी बनविण्याचे ठरले निमित्त...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011