नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गाई पेक्षा म्हशी जास्त दूध देतात, जगात सर्वाधिक म्हशी भारतात आहेत. भारतात म्हशींच्या तब्बल २६ जाती आहेत. त्यापैकी १२ जाती नोंदणीकृत आहेत, ज्या जास्तीत जास्त दूध देतात. यामध्ये मुर्हा, निलीरावी, जाफराबादी, नागपुरी, पंढरपुरी, बन्नी, भदावरी, चिलका, मेहसाणा, सुरती, टोडा या जातीच्या म्हशींचा समावेश आहे. साहजिकच भारतात दूध व्यवसायाची भरभराट झाली आहे. याची दखल घेतल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय डेअरी संमेलनाच्या उद्घाटनावेळी घोषणा केली की, सर्व दुग्धजन्य प्राण्यांचे आधार कार्ड बनविले जाणार आहे.
मोदी पुढे म्हणाले की, भारतातील डेअरी क्षेत्राला विज्ञानाशी जोडून त्याचा विस्तार केला जात आहे. भारत दुग्धजन्य प्राण्यांचा सर्वात मोठा डाटाबेस तयार करत आहे. डेअरी क्षेत्राशी निगडीत प्रत्येक जनावराला टॅग केले जात आहे. आधार कार्ड बनवण्यासाठी बायोमेट्रिक माहिती लागते. म्हणजे बोटांचे ठसे, डोळे आदी माहिती घेतली जाते. याप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्राण्यांची बायोमेट्रिक माहिती घेतली जाणार आहे. पशु आधार असे या मोहिमेचे नाव देण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत आधार कार्डने करोडो भारतीयांच्या आयुष्यात एक वेगळी कलाटणी मिळाली आहे. किसान योजना असो की अन्य कोणतीही सरकारी मदत थेट शेतकरी, नागरिकाच्या खात्यात जाते.
जनावरांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासोबतच दुग्धजन्य पदार्थांशी संबंधित बाजारपेठ विस्तारण्यास केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी दिली. गुजरातमधील जाफराबादी, म्हैसाना, मुरहा, सुरती आदि प्रजातीच्या म्हशी प्रसिद्ध आहेत, त्याचप्रमाणे गुजरातच्या कच्छमध्ये बन्नी म्हैशीची प्रजाती प्रसिद्ध आहे. या म्हैशीचा मोदींनी एक किस्सा सांगितला आहे. दिवसा तिथे खूप उन असते. यामुळे ही म्हैस रात्रीच्यावेळी चरते. ती चाऱ्यासाठी गोठ्यापासून १५ ते १७ किमीचा प्रवास करते. परंतू दिवस उजाडू लागताच ती परत तिच्या गोठ्यात वाट न चुकता येते. सहाजिकच बन्नी म्हैस गोठा किंवा रस्ता चुकल्याचे खूप कमी ऐकू येते. परदेशातून आलेल्या आमच्या मित्रांना हे ऐकून धक्का बसेल की ती जेव्हा चरायला जाते तेव्हा तिचा मालक किंवा गुराखी त्यांच्यासोबत नसतो. वाळवंटात पाणी कमी असते परंतू, त्या पाण्यातही तिचे भागते, असे मोदी म्हणाले.
अपत्यहीन दाम्पत्यांसाठी आयव्हीएफ तंत्रज्ञान वापरले जाते. मात्र, आयव्हीएफ तंत्र उपयुक्ततेच्या बाबतीत आता केवळ मानव जातीपुरते मर्यादित राहिलेले नसून जनावरांवरही याचा प्रयोग सुरू झाला आहे. गुजरातच्या सोमनाथ जिल्ह्यातील धनेज येथे बन्नी म्हशी जातीच्या एका म्हशीने आयव्हीएफ तंत्राच्या मदतीने रेडकू जन्माला घातले आहे. विनय नावाच्या शेतकर्याकडे बन्नी जातीच्या ६ म्हशी आहेत. त्यापैकी एका म्हशीने देशातील पहिले बन्नी आयव्हीएफ रेडकू जन्माला घातले आहे. दोन वर्षापूर्वीपंतप्रधान नरेंद्र मोदी हे १५ डिसेंबर २०२० रोजी गुजरातमधील कच्छच्या भेटीदरम्यान म्हशीच्या बन्नी जातीबद्दल भरभरून बोलले होते. आता आज पुन्हा त्यांनी या म्हशीचा उल्लेख केला आहे.
भारत के पास गाय और भैंस की जो स्थानीय नस्लें हैं, वो कठिन से कठिन मौसम में भी Survive करने के लिए जानी जाती हैं। गुजरात की बन्नी भैंस इसका एक बेहतरीन उदाहरण है। pic.twitter.com/Rhi12A0cCW
— Narendra Modi (@narendramodi) September 12, 2022
PM Narendra Modi Big Announcement for Cow and Buffalo Animals
International Dairy World Summit