नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळीच संपूर्ण देशवासियांना मोठा सुखद धक्का दिला आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी ९ वाजता देशवासियांशी अचानकपणे देेशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशवासियांची माफी मागितली आहे. तसेच, देशातील तिन्ही नवे कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणाही मोदी यांनी केली आहे. आगामी पाच राज्यातील निवडणुका आणि त्यानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदींनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
देशवासियांशी संवाद साधताना मोदी म्हणाले की, तिन्ही कृषी कायदे करण्यामागे मोठा उद्देश होता. मात्र, हे कायदे संमत केल्यानंतर त्याच्या अंमलबजावणी आणि फायद्यांबाबत जनजागृती व तपस्येत आम्ही कमी पडलो. काही शेतकऱ्यांना आम्ही ते समजावू शकलो नाही. त्यामुळे आम्ही ते तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत. शेतकऱ्यांच्या समस्या आम्ही जाणतो. मी त्या जवळून पाहिल्या आहेत. शेतकरी हितासाठी आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात १ लाख ६२ हजार कोटी रुपये जमा केले आहेत. याद्वारे अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठी मदत झाल्याचे मोदी म्हणाले. तसेच, मोदी सरकारने आजवर शेतकऱ्यांसाठी नेमके काय प्रयत्न केले, कोणत्या योजना आणल्या, त्याचा कसा फायदा होत आहे, कृषी अर्थसंकल्पात किती तरतूद केली आहे यासंदर्भातील सर्व माहिती मोदींनी यावेळी दिली.
बघा मोदी यांच्या भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ
https://twitter.com/narendramodi/status/1461537443337818113