नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ झाला आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सर्व खासदारांचे मी स्वागत करतो. भारताला वैश्विक स्तरावर खुप संधी आहेत. देशाची आर्थिक प्रगती, कोरोना प्रतिबंधक लसीकरण, स्वदेशी बनावटीची लस यामुळे जगभरात भारताविषयी एक विश्वास तयार झाला आहे. आताच्या अधिवेशनात यासंदर्भात मुक्तपणे चर्चा होईल, अशी अपेक्षा आहे. देशाला पुढे नेण्यासाठी खुल्या मनाने आणि उत्तम चर्चा होईल, अशी मला खात्री आहे. मी सर्वांना आवाहन करतो की, फलदायी चर्चा घडवावी आणि देशाचा विकास साधावा.
https://twitter.com/PIB_India/status/1488025415642128384?s=20&t=RfoAMWckhKf_0aZzdhdBJw