नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी कर्नाटकातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात २० किलोमीटर जंगल फिरले. या सफारीसाठी मोदींचा वेगळा पोशाख होता. त्यामुळे त्याची जोरदार चर्चा झाली. मोदींनी तब्बल २ तास या जंगलात घालवले. मात्र, या प्रवासात त्यांना एकही वाघ दिसला नाही. पंतप्रधानांना वाघ न दिसल्याने आता त्याला जबाबदार कोण याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच, यासंदर्भात कारवाईसाठीही हालचाली गतिमान झाल्या आहेत.
पंतप्रधान मोदींनी तमिळनाडूच्या निलगिरी डोंगरी जिल्ह्यातील मुदुमलाई येथील हत्तींच्या छावणीलाही भेट दिली. कॅम्पमध्ये हत्तींनी पंतप्रधानांचे स्वागत केले. मोदींनी येथील व्याघ्र प्रकल्पातील थेप्पाक्कडू कॅम्पमध्ये काही हत्तींना ऊसही खाऊ घातला. पंतप्रधान मोदींनी या सफारीनंतर देशातील वाघांची आकडेवारी जाहीर केली. भारतातील व्याघ्र प्रकल्पाला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने म्हैसूरमध्ये देशातील वाघांच्या लोकसंख्येची ताजी आकडेवारी जाहीर करण्यात आली. ‘अमृत काल’ या कार्यक्रमात पंतप्रधानांनी व्याघ्र संवर्धनासाठी सरकारचे व्हिजन मांडले. तसेच, इंटरनॅशनल बिग कॅट्स अलायन्स (IBCA)ही लाँच करण्यात आले.
https://twitter.com/narendramodi/status/1645028951977349123?s=20
पंतप्रधान मोदी चामराजनगर जिल्ह्यातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात सकाळी पोहोचले आणि त्यांनी संवर्धन कार्यात सहभागी असलेल्या क्षेत्रातील आघाडीच्या कामगार आणि स्वयं-सहाय्यता गटांशी संवाद साधला. तमिळनाडूच्या सीमेला लागून असलेल्या चामराजनगर जिल्ह्यातील मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील थेप्पाकडू हत्तींच्या छावणीलाही त्यांनी भेट दिली आणि हत्तींच्या छावणीतील माहूत आणि ‘कवड्यां’शी संवाद साधला. पंतप्रधानांनी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांशीही संवाद साधला, ज्यांनी नुकत्याच संपलेल्या व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यमापन अभ्यासाच्या पाचव्या फेरीत उच्च गुण मिळवले.
मोठ्या हौसेने पंतप्रधान बंदिपूर व्याघ्र प्रकल्पात आले. पण, २० किमीचे अंतर आणि २ तासांचा कालावधी घालवूनही मोदींना वाघ दिसला नाही. ही बाब अतिशय वाईट असल्याची प्रतिक्रीया उमटत आहे. कारण, खुद्द पंतप्रधानांनाच वाघ दिसला नाही. हे असे का झाले. त्यांच्या सोबत अनुभवी वनरक्षक किंवा अधिकारी किंवा वाहन चालक नव्हते की अन्य काही कारणे आहेत, यावर चर्चा झडत आहेत.
त्यातच या जंगलातील वनाधिकाऱ्यांवर कारवाईसाठी दबाव वाढत आहे. खासकरुन भाजपच्या काही नेत्यांनीही यासाठी दबाव टाकला आहे. मोदींच्या जीपचे सारथ्य करणाऱ्या वाहनचालकावर कारवाई करण्यासाठी आग्रह धरला जात आहे. त्या जीपचा परवानाही रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत. आता यासंदर्भात नक्की काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
https://twitter.com/_prashantkadam/status/1646020028490473472?s=20
PM Narendra Modi Bandipur Tiger Project Tour Action