नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बंगळुरू येथील येलाहंका वायुसेना तळावर चौदाव्या एअरो इंडीया 2023 चे उद्घाटन करणार आहेत. “एक अब्ज संधींची धावपट्टी’ ही यंदाच्या एरो इंडिया 2023 ची संकल्पना आहे. एरो इंडिया 2023 मध्ये 80 हून अधिक देशांचा सहभाग असेल. एरो इंडिया 2023 मध्ये सुमारे 30 देशांचे मंत्री आणि जागतिक आणि भारतीय ओईएमचे 65 मुख्य कार्यकारी अधिकारी सहभागी होण्याची शक्यता आहे.
बंगळुरू येथील येलहंका हवाई दल तळावर 13-17 फेब्रुवारी 23 या कालावधीत एअरो इंडिया 2023 चा द्वैवार्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संरक्षण क्षेत्र उद्योगांना त्यांची अद्ययावत उपकरणे, हेलिकॉप्टर आणि विमाने प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देईल. संरक्षण दलातील कर्मचार्यांना मूळ उपकरणे उत्पादक (ओईएम) प्रतिनिधींशी संवाद साधण्याची आणि भविष्यात सशस्त्र दलात समाविष्ट करण्यासाठी विचाराधीन उत्पादनांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या पंतप्रधानांच्या संकल्पनेला अनुसरून, हा कार्यक्रम स्वदेशी उपकरणे/तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यावर आणि परदेशी कंपन्यांसोबत भागीदारी करण्यावर भर देईल. भारतीय संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेवरील पंतप्रधानांचा भर देखील प्रदर्शित केला जाईल. या कार्यक्रमात देशाची डिझाईन क्षेत्रातील प्रगती, युएव्ही क्षेत्रातील वाढ, संरक्षण अंतराळ आणि भविष्यातील तंत्रज्ञान आदी संदर्भातील कार्यक्रम प्रदर्शित केले जातील.
या माध्यमातून लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए)-तेजस, एचटीटी-40, डॉर्नियर लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर (एलयुएच), लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (एलसीएच) आणि ऍडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर (एएलएच) सारख्या स्वदेशी हवाई संबंधित निर्यातीला प्रोत्साहन दिले जाईल. जागतिक पुरवठा साखळीमध्ये देशांतर्गत एमएसएमई आणि स्टार्ट-अप्सना एकत्रित करण्यात आणि सह-विकास आणि सह-उत्पादनासाठी भागीदारीसह परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यातही या कार्यक्रमामुळे मदत होईल.
https://twitter.com/VivekSi85847001/status/1624436134393823232?s=20&t=m1hEVOaKAIeL33t_cyqF0Q
एरो इंडिया 2023 प्रदर्शनात सुमारे 100 परदेशी आणि 700 भारतीय कंपन्यांसह 800 हून अधिक संरक्षण कंपन्यांचा सहभाग असेल. प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या भारतीय कंपन्यांमध्ये एमएसएमई आणि स्टार्ट-अप यांचा समावेश आहे. विशिष्ट तंत्रज्ञानाची प्रगती, एरोस्पेसमधील वाढ आणि देशातील संरक्षण क्षमता यांचे ते प्रदर्शन करतील. एअरो इंडीया 2023 मधील प्रमुख प्रदर्शकांमध्ये एयरबस, बोइंग, डसॉल्ट एविएशन, लॉकहीड मार्टिन, इस्त्राईल एयरोस्पेस इंडस्ट्री, ब्रह्मोस एयरोस्पेस, आर्मी एविएशन, एचसी रोबोटिक्स, एसएएबी, सफरान, रोल्स रॉयस, लार्सन एंड टुब्रो, भारत फोर्ज ए लिमिटेड (लाइगर, भारत) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल), भारत डायनॅमिक्स लिमिटेड (बीडीएल) आणि बीईएमएल लिमिटेड यांचा समावेश आहे.
‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्याच्या देशाच्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने, भारतीय नौदलाने अलीकडेच , हलके लढाऊ विमान (नौदल ) ,स्वदेशी तंत्रज्ञान प्रात्यक्षिक विमान (ट्विन इंजिन डेक बेस्ड फायटर) स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतवर उतरवले आहे.या विमानाचे उड्डाण भारतीय नौदलाच्या चाचणीसाठी नियुक्त वैमानिकाने केले होते. ही विशिष्ट क्षमता भारतीय नौदलाच्या आत्मनिर्भर भारताच्या दीर्घकालीन दृष्टीकोनाचे फलित आहे.
https://twitter.com/Suryakiran_IAF/status/1623663831359848454?s=20&t=m1hEVOaKAIeL33t_cyqF0Q
एअरो इंडिया 2023 दरम्यान, भारतीय नौदल अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होत आहे.या कार्यक्रमा दरम्यान एएलएच एमके III आणि एमआर विमान पी8आय ही स्वदेशी विमाने,अनुक्रमे हवाई कसरती आणि स्टॅटिक डिस्प्लेमध्ये सहभागी होतील. भारतीय नौदलाने संरक्षण उत्पादन विभागाच्या सहकार्याने ‘हवाई शस्त्रास्त्र देखभालीमध्ये आत्मनिर्भरता’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले आहे. ही चर्चासत्र सरकारच्या उपक्रमांवर आणि सशस्त्र दलातील क्षेपणास्त्रांच्या देखभालीसाठी आणि पुढील वाटचालीवर तपशीलवार चर्चा करण्याच्या अनुषंगाने, संरक्षण मंत्रालय , वापरकर्ते , देखभाल करणारे गुणवत्ता हमी संस्था , संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि भारतीय उद्योगातील प्रमुख भागधारकांना व्यासपीठ प्रदान करतील.
शिक्षण आणि उद्योगांसोबत निरंतर प्रतिबद्धता हे भारतीय नौदलाच्या आत्मनिर्भरता प्राप्त करण्याच्या प्रयत्नांचे केंद्रस्थान आहे.या दिशेने विविध शैक्षणिक संस्था आणि प्रमुख उद्योग भागीदार यांच्यात माहिती आणि संसाधने सामायिक करण्यासाठी सामंजस्य करार केले जातात.एरो इंडिया 2023 दरम्यान, दोन प्रमुख भागीदार म्हणजेच इस्रो आणि मेसर्स एव्ही ऑईल यांच्यात ‘बंधन’ या कार्यक्रमाचा भाग म्हणून सामंजस्य कराराच्या माध्यमातून जोडले जात आहे. वर्षानुवर्षे व्याप्ती आणि भव्यता वाढल्याने, नौदल हवाई विभागाचा विकास आणि सक्षमीकरण तसेच राष्ट्राच्या संरक्षण दलांच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने एअरो इंडिया आणखी एक महत्वपूर्ण एक पाऊल ठरेल.
https://twitter.com/DDNewslive/status/1624688692827680768?s=20&t=m1hEVOaKAIeL33t_cyqF0Q
Pm Narendra Modi Aero India Show 2023