नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, कतारचे आमीर तामिम बिन हमद अल थानी, यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली आणि त्यांनी दिलेल्या दिवाळी शुभेच्छांबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच कतार इथे होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. याबद्दल केलेल्या ट्वीटमध्ये पंतप्रधानांनी म्हटलं आहे; “कतारचे आमीर @TamimBinHamad यांच्याशी संभाषण करुन अतिशय आनंद झाला. दिवाळीनिमित्त त्यांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी त्यांचे आभार मानले. तसेच कतारमध्ये, @FIFAWorldCup च्या यशस्वी आयोजनासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. भारत-कतार यांच्यातील राजनैतिक संबंधाना 2023 मध्ये 50 वर्षे पूर्ण होणार आहेत, त्याचा उत्सव एकत्रितपणे साजरा करु, यावर या चर्चेत दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.”
https://twitter.com/narendramodi/status/1586310214110031872?s=20&t=pwTiwIck0TgjxOYByz6jTQ