इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २७ पर्यंटकांचा मृत्यू झाला. त्यात महाराष्ट्रातील दोन नागरिकांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा आटोपता घेतला. नियोजीत वेळेपूर्वीच त्यांनी दौरा संपवला. आज ते पहाटे पाच वाजता दिल्लीत दाखल झाले आहे.
या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. पीडितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे.
या घृणास्पद कृत्यामागील लोकांना न्याय मिळवून दिला जाईल… त्यांना सोडले जाणार नाही! त्यांचा दुष्ट अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा निर्धार अढळ आहे आणि तो आणखी मजबूत होईल.