नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आषाढी एकादशीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. आषाढी एकादशीच्या या मंगल प्रसंगी, माझ्याकडून सर्वांना शुभेच्छा. या विशेष दिनी, भगवान विठ्ठलाने आपल्याला उदंड आनंद आणि चांगले आरोग्य याकरिता आशीर्वाद द्यावे अशी प्रार्थना आपण करूया. वारकरी चळवळ आपल्या उत्कृष्ट परंपरांचे प्रतिनिधित्व करते आणि एकता व समानतेच्या भावनेला अधिक उत्तेजन देते. अशा शब्दात ट्वीट करत पंतप्रधानांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
https://twitter.com/narendramodi/status/1417344335725568001?s=20