रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाऊबीजेच्या दिवशी केदारनाथमध्ये; हे आहेत कार्यक्रम

by India Darpan
ऑक्टोबर 29, 2021 | 9:39 pm
in राष्ट्रीय
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिवाळी पाडवा आणि भाऊबीज हे दिवस चारधाम यात्रेतील तीर्थस्थळ केदारनाथ येथे साजरा करणार आहेत. येत्या 5 नोव्हेंबर रोजी, उत्तराखंड मधील केदारनाथ येथे पंतप्रधानांचे भरगच्च कार्यक्रम असणार आहेत.

पंतप्रधान आपल्या भेटीदरम्यान मंदिरात जाऊन केदारनाथाचे दर्शन घेतील. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते, आदि शंकराचार्यांच्या समाधीस्थळाचे उद्घाटन होईल, तसेच शंकराचार्य यांच्या पुतळ्याचे अनावरण देखील त्यांच्या हस्ते होईल. 2013 साली आलेल्या प्रचंड प्रलयात ही समाधी उध्वस्त झाली होती, त्यानंतर नव्याने ती बांधण्यात आली आहे. हे संपूर्ण पुनर्निर्माणाचे कार्य पंतप्रधानांच्या देखरेखीखाली झाले आहे.

पंतप्रधान सरस्वती आस्थापथाच्या कामाचाही आढावा घेतील आणि सध्या सुरु असलेल्या कामाची तपासणी करतील. त्यानंतर पंतप्रधान सार्वजनिक सभेलाही संबोधित करतील. तसेच, केदारनाथ इथे पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होईल. यात, सरस्वती काठाला लागून असलेला भक्तिमार्ग आणि घाट, मंदाकिनी नदीला लागून असलेला भक्तिमार्ग, तीर्थ पुरोहितांची घरे आणि मंदाकिनी नदीवर बांधलेला गरुड छत्ती पूल या कामांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पांसाठी 130 कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च झाला आहे.

तसेच 180 कोटी रुपयांच्या निधीतून उभारल्या जाणाऱ्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन देखील पंतप्रधानांच्या हस्ते होईल. यात, संगम घाटाचे नूतनीकरण, पर्यटक सुविधा आणि प्रथमोपचार केंद्र, प्रशासकीय कार्यालय आणि रुग्णालय, दोन अतिथीगृह, पोलीस स्थानके, आदेश आणि नियंत्रण केंद्र, मंदाकिनी भक्तिमार्ग मार्गिका व्यवस्थापन आणि पाऊस निवारा तसेच, सरस्वती नागरी सुविधा इमारत, अशा विविध प्रकल्पांचा समावेश आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक -जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची तालुकानिहाय ही आहे स्थिती

Next Post

साखर कामगारांची दिवाळी गोड; राज्य सरकारने घेतला हा मोठा निर्णय

India Darpan

Next Post
Mantralay 2

साखर कामगारांची दिवाळी गोड; राज्य सरकारने घेतला हा मोठा निर्णय

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
cbi

सीबीआय न्यायालयाने या बँकेच्या दोन तत्कालीन व्यवस्थापकांसह चार आरोपींना तीन वर्षांची सुनावली सक्तमजुरीची शिक्षा

जून 22, 2025
nia11

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणात एनआयएने दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल २ जणांना केली अटक…

जून 22, 2025
Untitled 72

अमेरिकेने अणुस्थळांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी केला हल्ला

जून 22, 2025
trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011