नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. एक्स या सामाजिक माध्यमावरील संदेशात पंतप्रधान म्हणाले की, आपल्या सर्वांना गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. श्रद्धा आणि भक्तिभावाने भरलेला हा पवित्र सोहळा प्रत्येकासाठी मंगलदायी ठरो. गणरायाने आपल्या सर्व भक्तांना सुख, शांती आणि उत्तम आरोग्य द्यावे, अशी गणरायाकडे प्रार्थना.