नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची एक तास पंतप्रधान कार्यालयात महत्त्वाची भेट झाल्यामुळे राजकीय चर्चेला उधान आले आहे. या भेटीचा तपशील समोर आला नसला तरी देशातील विविध विषयांवर या भेटीत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या दोन दिवसात शरद पवार यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंग, पियुष गोयल यांची भेट घेतली. त्यानंतर पवार यांची पंतप्रधांनाबरोबर ही भेट झाली आहे.
याअगोदरही शरद पवार व पंतप्रधांच्या अनेक भेटी झाल्या आहे. पण, मधल्या काळात त्या कमी झाल्या. पण, आता ही भेट झाल्यामुळे त्यामागे नेमके कारण समोर न आल्यामुळे वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहे. पवार हे जेष्ठ नेते आहे. त्यामुळे ते देशातील वेगवेगळ्या विषयांवर सरकारबरोबर चर्चा करत असतात. त्यांना सल्लाही देतात. त्यामुळे ही भेट राजकीय नसल्याचे काही राजकीय तज्ञांचे मत आहे.
सोमवारपासून संसदेचे अधिवेशन सुरु होणार आहे. पण, या अधिवेशानाअगोरच तीन दिवस आधी शरद पवार दिल्लीत पोहचले आहे. त्यामुळे या भेटीत संसदेत चर्चा होणा-या काही विषयाबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.तर दुसरीकडे या भेटीमुळे राज्याच्या राजकारणाची घडामोडीला जोडले जात आहे.
https://twitter.com/PMOIndia/status/1416290535086583808