नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खुद्द पंतप्रधानांनीच मंदिरातील सेवेकऱ्यांना गिफ्ट पाठवले असे कुणी तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का. त्यातही पंतप्रधानांच्या मतदारसंघातील ऐतिहासिक मंदिराच्या सेवेकऱ्यांना हे गिफ्ट मिळाले तर.. हे खरे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशीच्या मंदिरातील सेवेकऱ्यांना अनोखे गिफ्ट पाठवून सुखद धक्का दिला आहे. या गिफ्टमुळे ते हरखून गेले असून पंतप्रधानांचे आभार कसे मानावे, हेच त्यांना सध्या सूचत नाहीय.
भारतीय संस्कृतीत मंदिरांमध्ये प्रवेश करतांना चपला-बूट आदींसह विविध प्रकारची पादत्राणे मंदिराच्या बाहेरच काढून ठेवावी लागतात. त्याशिवाय मंदिरात प्रवेश मिळत नाही, ही प्रथा परंपरा हजारो वर्षांपासून सुरू आहे. सध्याच्या काळात अनेक मठ आणि मंदिरांमध्ये मंदिराचे सभागृह, सभामंडप, गर्भगृह आणि मंदिराच्या मुख्य गाभार्यात मार्बलसह अशाच प्रकारच्या फरशा बसवलेल्या असतात. या फरशा हिवाळ्यातच नव्हे तर अन्य ऋतूत देखील खूपच थंड तथा गार पडतात. इतकेच नव्हे हिवाळ्यात तर त्यावर पाऊल देखील ठेवावेसे असे वाटत नाही, परंतु अशाही परिस्थितीत मंदिरांमध्ये काम करणारे विविध विभागातील कर्मचारी मात्र अनवाणी पायाने येथे सेवा बजावत असतात.
एखादे मंदिर छोटे असेल तर त्याचा परिसर फारसा मोठा नसतो, परंतु काशी विश्वनाथ सारख्या मोठ्या मंदिरांमध्ये भाविकांची नेहमीच मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. सहाजिकच येथील कर्मचार्यांना नेहमीच अनवाणी पायाने धावपळ करावी लागते, मात्र असे करताना त्या ठिकाणी असलेल्या मार्गावरून चालताना त्यांच्या पायाचे मोठे हाल होतात, याची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ज्युट पासून तयार केलेली पादत्राणे पाठवून मोदी यांनी पुन्हा एकदा काशी विश्वनाथ धाममध्ये तैनात कर्मचारी-सेवक आणि पोलीस कर्मचाऱ्यांची मने जिंकली आहेत.
कडाक्याच्या थंडीत मार्बलवर अनवाणी ड्युटी करणाऱ्यांची चिंता करत मोदी यांनी ही व्यवस्था केली आहे. मोदी यांनी येथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सैनिक आणि जवानांसाठी ज्यूटचे बूट आणि चपला पाठवल्या आहेत. मंदिर परिसरात ही पादत्राणे पोहोचून अधिकाऱ्यांच्या हस्ते चपलांच्या १०० जोडांचे वाटप करण्यात आले. कारण मंदिर परिसरात चामड्याच्या किंवा रबराच्या चपला आणण्यास मनाई असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले. अशा स्थितीत कडाक्याच्या थंडीत २४ तास ड्युटी करताना सुरक्षा कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
मोदींच्या सूचनेनुसार, पीएमओ कार्यालयाने पाठवलेले ह ज्यूट शूज पोलीस आणि सीआरपीएफ जवानांव्यतिरिक्त पुजारी, सेवादार, सफाई कामगारांना देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत श्री क्षेत्र काशी आणि इथल्या भाविक आणि नागरिकांच्या सुविधांबद्दल बोलत असतात. लॉकडाऊनच्या काळातही त्यांनी स्वत: स्थानिक लोकांशी फोनवरून बोलून समस्या दूर करण्यासाठी सतत प्रयत्न केले. काशी विश्वनाथ धामच्या उभारणीदरम्यानही ते येथील प्रत्येक उपक्रमाची माहिती घेत राहिले.
https://twitter.com/ANINewsUP/status/1480419250904858626?s=20
येथील धामच्या उद्घाटनानंतर, पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम ज्या कामगारांनी हे धाम बांधले त्यांचा आदर केला आणि स्वतःच्या हातांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. एवढेच नाही तर त्यांनी मजुरांसोबत जेवणही केले. त्यामुळे मजूरच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांमध्येही कृतज्ञतेची भावना दिसून आली. आता पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींनी येथील सेवेतील जवानांची काळजी घेतली आहे. मंदिर परिसरात संगमरवरावर अनवाणी उभे राहून कर्तव्य बजावणारे कर्मचारी, सेवा कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना येणाऱ्या समस्यांची पंतप्रधानांनी दखल घेतली आहे.