नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशातील परशुराम कुंड महोत्सवाची काही क्षणचित्रे सामायिक केली आहेत. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांचे ट्विट शेअर करून पंतप्रधान म्हणाले; “एक आनंददायी अनुभव, अरुणाचल प्रदेशला भेट देण्याची एक अनोखी संधी आहे.”
https://twitter.com/narendramodi/status/1612013548254666755?s=20&t=nq0XLsXFsW1gay4ZrGaJ-A
अरुणाचल प्रदेश येथे भारत – चीन सिमेवर असलेले पवित्र आदितीर्थ महातीर्थ क्षेत्र भगवान परशुराम कुंड आहे. या तीर्थाचा मोठ्या प्रमाणात विकासाचे कार्य केंद्र सरकार, अरुणाचल प्रदेश सरकारने हाती घेतलेले आहे. त्याचप्रमाणे विप्र फाउंडेशन या राष्ट्रीय संस्थेच्या सहकार्याने ५१ फुट उंच पंचधातू कृत श्री विष्णूंचे सहावे अवतार श्री भगवान परशुराम यांची पंंच धातुच्या मुर्तीची प्रतिष्ठा होणार आहे. संपूर्ण भारतासाठी गौरवास्पद असलेल्या पवित्र कार्याचे महातीर्थावर येण्याचे आमंत्रण देण्यासाठी कांची कामकोटी येथून जयपूर पर्यंत जगतगुरु श्री शंकराचार्य यांचे आशीर्वाद घेऊन “भगवान परशुराम कुंड आमंत्रण यात्रेचा अमृत भारत रथ” देशभरात जाऊन आला आहे.
अरुणाचल प्रदेशात असलेल्या सीमारेषेवर भगवान परशुराम कुंड या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यात येणार असून, ५१ फूट उंचीची भगवान परशुरामाची पंचधातूची मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे. भारत सरकार , अरुणाचल प्रदेश सरकार यांचेकडून या परिसराचा कायाकल्प, संरक्षण , संवर्धन याचे कार्य होत आहे. परशुराम कुंड आमंत्रण यात्रेच्या प्रचारासाठी अमृत भारत रथ संपूर्ण देशभरात फिरवण्यात आला. अरुणाचल प्रदेशातील परशुराम कुंड या ठिकाणी होणारे दि १२ ते १६ जानेवारी दरम्यान होणारे विशेष मेळाव्यासाठी आमंत्रण देण्यासाठी विप्र फाउंडेशन यांनी आमंत्रण यात्रेचे आयोजन केले होते. पिवळ्या केशरी रंगाने सुशोभित केलेल्या अक्षदा देऊन येण्याचे आमंत्रण देण्यात आले. पुज्य स्वामी चिरंजीवी श्री रामनारायण दास जी यांचे समर्थ नेतृत्व व मार्गदर्शन या आमंत्रण यात्रेस लाभले होते.
PM Modi Parshuram Kund Mahotsav Video
Arunachal Pradesh Lohit 2023