कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे, त्यामुळे आरक्षणासह मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती एकदा पुन्हा आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला, गरीब घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलन केले आहे, मात्र त्याच वेळी छत्रपती शाहू महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संभाजी राजे छत्रपती यांच्या भेटीबाबत गंभीर आरोप केला आहे, तब्बल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाच वेळा भेटीसाठी वेळ मागितला. पण मोदींनी संभाजीराजेंना भेटीसाठी वेळ दिला नाही, असे छत्रपती शाहू महाराज यांनी म्हटले असून मराठा आरक्षणाचा प्रश्नासंदर्भात लवकर कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबईत यंदा फेब्रुवारी महिन्यात आझाद मैदानात उपोषणाला बसले होते, तेव्हात्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळला होता. तेव्हा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजी राजे यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सोडू अशा आश्वासन दिले होते परंतु अद्यापही त्याबाबत ठोस कारवाई झालेली दिसून येत नाही त्यामुळे पुन्हा एकदा मराठा समाज आरक्षणावरून आता संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले असून, त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.
मराठा समाजातील नागरिकांना आणि राज्यातील सर्व नागरिकांना याबाबत सांगत असून माझी भूमिका वेळोवेळी मी त्यांच्यासमोर मांडली आहे. आरक्षण रद्द झाल्यानंतर मी पुनर्विचार याचिका दाखल करा असे सांगितले होते. तसेच ती दाखल केल्यानंतर सध्या त्याबाबत काय स्टेट्स आहे, हे माहिती नाही. याबाबत अनेकदा समिती स्थापन करण्यात आली आहे. मराठा आरक्षणप्रश्नी न्यायालयातील प्रत्येक सुनावणीला संभाजीराजे हजर असतात. तसेच मराठा समाजासाठी वेळ पडली तर घटनादुरुस्तीसाठी देखील अभ्यास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले होते, तसेच न्यायालयतील सुनावणी, वकील, सरकार आणि मराठा समाज यांच्यात समन्वय ठेवण्यात आला आहे, असे सांगण्यात येते.
वास्तविक राज्य सरकारकडून मागण्या मान्य झाल्यानंतर त्यांनी तीन दिवसांनी उपोषण सोडले होते. तेव्हा राज्याचे तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी संभाजी छत्रपती यांची आझाद मैदानात भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्याचे लेखी पत्र त्यांना सुपूर्द केले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मान्य करण्यात आलेल्या सर्व मागण्या सर्वांसमोर वाचून दाखवल्या. संभाजीराजेंनी केलेल्या सर्व मागण्या पूर्ण केल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले होते.
मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर समाजाचे नुकसान होऊ नये, यासाठी आम्ही सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या व त्याकरिता आझाद मैदान येथे मी आमरण उपोषणही केले होते. तत्कालीन नामदार एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी येऊन जी आश्वासने दिली होती, ती आता मुख्यमंत्री म्हणून नैतिक जबाबदारीने पूर्ण करावीत, असे निवेदन मी त्यांना दिले होते. नियुक्त्यांचा विषय मार्गी लागला, हे त्या उपोषणाचेच यश आहे. समाजाच्या याच मागण्यांकरिता त्यांनी बैठक बोलाविली होती. मात्र यावेळी गोंधळ झाल्याने संभाजी राजे संतप्त झाले होते त्यानंतर मराठा क्रांती मोर्चा चे पदाधिकारी व संभाजीराजे यांच्यामध्ये वाद झाल्याचे सांगण्यात येत होते.
याबाबत छत्रपती संभाजी राजे यांनी म्हटले आहे की, मराठा समाजाला कायद्याच्या कक्षेत टिकणारे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मी गेले दीड दशक सर्व स्तरांवर लढा देत आहे. मग ते कसे द्यायचे हा सरकारचा विषय आहे. समाजासाठी कोणतीही मागणी करण्यास कुणालाही आमचा विरोध नाही व पुढेही असणार नाही. पण आपली मागणी करत असताना आरक्षण नेमके मिळवणार कसे, तेदेखील समाजाला सांगितले पाहिजे. केवळ आपले महत्त्व राखण्यासाठी समाजाची दिशाभूल करू नये. तसेच माझे प्रामाणिक कार्य पाहून कित्येक संघटनांनी, लोकांनी अनेकवेळा माझ्याकडे नेतृत्व दिले, पण कधीही मी स्वतःहून हे नेतृत्व स्वीकारले नाही. समाजासाठीचा माझा हा लढा मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सुरूच राहील, असेही संभाजी छत्रपती यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे.
PM Modi Meet Chhatrapati Sambhaji Raje