नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जन समर्थ पोर्टल लाँच केले आहे. कर्जावर आधारित सर्व प्रकारच्या सरकारी योजना जन समर्थ पोर्टलशी जोडण्यात आल्या आहेत. लाभार्थी आणि कर्जदारांना थेट जोडणारे हे भारतातील पहिले व्यासपीठ आहे. हे पोर्टल विविध क्षेत्रांच्या सर्वसमावेशक वाढ आणि प्रगतीला चालना देणार आहे.
सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य व्हावे, यासाठी सरकारने विविध मंत्रालये आणि विभागांमार्फत राबविल्या जाणाऱ्या अनेक योजनांच्या वितरणासाठी ‘जन समर्थ’ हे कॉमन पोर्टल सुरू करण्याची योजना आखली आहे. सूत्रांनी सांगितले की नरेंद्र मोदी सरकार ‘किमान सरकार, जास्तीत जास्त प्रशासन’ या संकल्पनेसह एक नवीन पोर्टल सुरू करण्याचा विचार करत आहे, ज्यामध्ये १५ क्रेडिट – लिंक्ड सरकारी योजनांचा समावेश आहे. केंद्राच्या काही योजनांमध्ये अनेक एजन्सींचा सहभाग असतो, त्यामुळे हळूहळू विस्तार केला जाईल.
या सुविधांचा समावेश
प्रधान मंत्री आवास योजना आणि क्रेडिट लिंक्ड कॅपिटल सबसिडी स्कीम (CLCSS) यांसारख्या योजना विविध मंत्रालयांद्वारे चालवल्या जात आहेत. या पोर्टलमुळे सर्व योजना एकाच व्यासपीठावर आणण्यात येईल. जेणेकरून लाभार्थी कोणत्याही अडचणीशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतील. आतापर्यंत त्याची प्रायोगिक चाचणी घेतली जात होती. चाचणी यशस्वी झाल्यानंतरच आज पंतप्रधानांच्या हस्ते पोर्टल लॉन्च होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सह इतर कर्जदार देखील या पोर्टलचा वापर करु शकणार आहेत. पोर्टलमध्ये ओपन आर्किटेक्चर असेल, ज्यामुळे भविष्यात राज्य सरकार आणि इतर संस्था देखील त्यांच्या योजनांचा समावेश या व्यासपीठावर करू शकतील.
13 सरकारी योजनांचा लाभ घेण्याच्या अनुषंगाने अर्ज सादर करण्यासाठी आणि 125+वित्तीय संस्था ( एमएलाय ) (सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसह) निवडण्यासाठी” जन समर्थ” पोर्टल एक खिडकी सुविधा प्रदान करते. सीबीडीटी,जीएसटी, उद्यम (युडीवायएएम), एनईनसेल, युआयडीएआय, सीआयबीआयएल इत्यादींसोबत प्रत्यक्ष त्या त्या वेळी पडताळणी झाल्यामुळें कर्जाची जलद प्रक्रिया सुनिश्चित होते.”जन समर्थ” पोर्टल कृषी, उपजीविका आणि शिक्षण या श्रेणीतील सरकारी योजनांअंतर्गत कर्जाची सुविधा उपलब्ध करून देईल. जन समर्थ पोर्टलवर 13 सरकारी योजना आधीपासूनच आहेत आणि आणखी योजना समाविष्ट केल्या जातील. जन समर्थ” पोर्टल पात्रता तपासेल, तत्वतः मंजुरी देईल आणि निवडलेल्या बँकेकडे अर्ज पाठवेल.हे पोर्टल प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर लाभार्थ्यांना अद्यतनित ठेवेल.बँकेच्या शाखांना अनेकदा भेट देण्याची गरज राहणार नाही.