बुधवार, ऑक्टोबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पंतप्रधान मोदींनी केले या अत्याधुनिक विमानतळ टर्मिनलचे उदघाटन; अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये

नोव्हेंबर 12, 2022 | 5:34 am
in राष्ट्रीय
0
FhRdOsnX0AM51ri e1668184923800

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरू येथे केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 चे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी विमानतळ प्राधिकरणांशी संवाद साधला. यावेळी त्यांना टर्मिनल 2 च्या इमारतीच्या मॉडेलची माहिती देण्यात आली. पंतप्रधानांनी अनुभूती केंद्रातील सुविधांचीही पाहणी केली आणि केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 च्या परिसरामधून पायी चालत पाहणी केली. पंतप्रधानांनी टर्मिनल 2 बद्दलचा लघुपटही पाहिला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल 2 क्षमतेत भर घालेल आणि सुविधांमध्ये आणखी वाढ करेल. आपल्या शहरी केंद्रांना उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आमच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे.टर्मिनल सुंदर आणि प्रवासी स्नेही आहे ! त्याचे उद्घाटन करून आनंद झाला.”

बंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल 2 सुमारे 5000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे. हे टर्मिनल विमानतळाची प्रवासी क्षमता प्रतिवर्ष सध्याच्या सुमारे 2.5 कोटीं प्रवासी क्षमतेवरून दुप्पट करून 5-6 कोटी प्रवाशांपर्यंत पोहोचवेल. बंगळुरूच्या गार्डन सिटीला मानवंदना म्हणून आणि प्रवाशांना “बागेत फिरत असल्याचा ” अनुभव मिळावा यांसारखी टर्मिनल 2 ची रचना करण्यात आली आहे. प्रवासी 10,000+ चौरस मीटर हिरव्या भिंती, हँगिंग गार्डन्स आणि बाह्य भागात असलेल्या बागांमधून प्रवास करतील.

https://twitter.com/muthin190/status/1590962802520645632?s=20&t=FntxJcotOeDG7k0LmI2i3A

विमानतळाने संपूर्ण संकुलामध्ये अक्षय्य ऊर्जेच्या 100% वापरासह शाश्वततेचा मापदंड यापूर्वीच स्थापित केला आहे. शाश्वततेच्या तत्त्वांच्या आधारावर टर्मिनल 2 ची रचना करण्यात आली आहे. शाश्वततेच्या उपक्रमांवर आधारित, टर्मिनल 2 हे कार्यान्वयन सुरू करण्यापूर्वी यूएस जीबीडी द्वारे (ग्रीन बिल्डिंग कौन्सिल) पूर्व-प्रमाणित प्लॅटिनम मूल्यांकन मिळवणारे जगातील सर्वात मोठे टर्मिनल असेल. ‘नवरसा’ च्या संकल्पनेच्या माध्यमातून टर्मिनल 2 मध्ये सर्व कलाकृती एकत्रितपणे दर्शवण्यात आल्या आहेत. या कलाकृती कर्नाटकचा वारसा आणि संस्कृती तसेच व्यापक भारतीय लोक परंपरा प्रतिबिंबित करतात.

एकंदरीत, टर्मिनल 2 ची रचना आणि वास्तू स्थापत्य , बागेमध्ये असणारे टर्मिनल, शाश्वतता , तंत्रज्ञान आणि कला आणि संस्कृती या चार मार्गदर्शक तत्त्वांनी प्रभावित आहे. टर्मिनल 2 आधुनिक असले तरी निसर्गाशी जवळीक साधणारे आणि सर्व प्रवाशांना एक संस्मरणीय ‘गंतव्य स्थळाचा ‘ अनुभव देणारे पैलू हे घटक प्रदर्शित करतात. पंतप्रधानांसोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित होते.

https://twitter.com/narendramodi/status/1590999235499290625?s=20&t=-QDucjyZx2ipHsV-5mYhRA

PM Modi Inaugurate Advance Airport Terminal Features
Bangalore International Airport Terminal 2

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सर्वसामान्यांची पुन्हा परीक्षा! खाद्यतेलाच्या किंमती वाढणार

Next Post

‘भारत जोडो’ यात्रेत राहुल गांधींकडून दोन विद्यार्थ्यांना लॅपटॉपची भेट; एक होणार इंजिनीअर तर दुसरा डॉक्टर

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
FhQT3xCUYAAwxQM

'भारत जोडो' यात्रेत राहुल गांधींकडून दोन विद्यार्थ्यांना लॅपटॉपची भेट; एक होणार इंजिनीअर तर दुसरा डॉक्टर

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011