विशेष प्रतिनिधी, मुंबई
तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या गुजरात राज्यातील नुकसानीची पाहणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. मात्र, त्याच वादळामुळे अशाच प्रकारचे नुकसान महाराष्ट्रातही झाले आहे. मग, पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रीतल नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा का नाही केला, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. पंतप्रधान मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत की भारताचे अशी खोचक टीकाही राष्ट्रवादीने केली आहे. सर्वसामान्यांच्या मनात जो प्रश्न आहे तोच आम्ही विचारत आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/NCPspeaks/status/1394935507595915264